एक हाक मदतीसाठी: इंदापूरचे कॅन्सरग्रस्त नागनाथ पवार यांच्या ऑपरेशनसाठी मदतीचे आवाहन.

इंदापूर: इंदापूरातील बाबा चौक येथील रहिवाशी नागनाथ नामदेव पवार हे सध्या सोलापूर येथे ऍडमिट असून त्यांना PANCREAS CANCER ( स्वादुपिंड कॅन्सर ) सारखा अत्यंत गंभीर आजार झाला आहे व या आजारातून बाहेर येण्यासाठी त्यांना ऑपरेशन आणि औषधोपचार यासाठी एकूण 569900 ( पाच लाख एकोणसत्तर हजार नउशे रूपये ) एवढा खर्च अपेक्षित आहे. सदरचे रुग्ण नागनाथ पवार यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून त्यांचे ऑपरेशन डॉ.पराग कुमठेकर यांच्या कुमठेकर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड कॅन्सर रिसर्च सेंटर येथे करण्याचे आयोजले आहे.
नागनाथ पवार यांचा एकुलता एक मुलगा मनोज पवार यांचे गेल्या म्हणजेच गेल्यावर्षी 30 ऑक्टोबर 2021 रोजी हृदयविकाराच्या आजाराने मृत पावलेला होता.त्यानंतर त्यांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची झाली आहे.सध्या नागनाथ पवार हेच वयाच्या 62 व्या वर्षी त्यांच्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख असून त्यांचे ऑपरेशन 25 नोव्हेंबर पर्यंत करणे अत्यंत आवश्यक आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.तरी सर्वांनी शक्य तेवढी मदत करावी असे आवाहन नागनाथ पवार यांचे पुतणे विशाल मारुती पवार यांच्याकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 7083453692 (विशाल मारुती पवार)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here