इंदापूर: शिवधर्म फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांनी आज माध्यमांशी बोलताना शुक्रवारी होणाऱ्या मार्गदर्शन सभेची माहिती दिली ते म्हणाले की गेल्या काही वर्षांपूर्वी संभाजी भिडे गुरुजींनी एक संकल्प केला होता.याच संकल्पाला अनुसरून शुक्रवारी नगरपालिका मैदानावर सायंकाळी 6 वाजता संभाजी भिडे गुरुजी इंदापुरात येणार आहेत. संभाजी भिडे गुरुजींच्या संकल्पानुसार राजदरबारात 32 मण सोन्याचं सिंहासन पुनर्रस्थापित करण्यात येणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर वयाच्या ४४व्या वर्षी ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर रायगड मोगलांच्या हातात गेला. त्यांनी गडावरील सर्व वस्तू, वास्तू, ऐतिहासिक कागदपत्रे जाळली. ३२ मण सोन्याचे सिंहासन तुकडे करून पळविले.
गेल्या आठवड्यामध्ये युवा नेते तथा शिवधर्म फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांनी त्यांच्या सहकार्यासह भिडे गुरुजी यांची भेट घेऊन 32 मण सोन्याचे सिंहासन करण्यासाठी लागेल ती मदत करायला शिवधर्म फाउंडेशन तयार आहे. त्याचप्रमाणे 32 मण सिंहासन रायगडावर प्रस्थापित होणाऱ्या सुवर्ण सिंहासनाचा खडा पहारा आणि त्याची आवश्यकता याविषयी भिडे गुरुजींनी इंदापुरात येऊन मार्गदर्शन करावे अशी दीपक अण्णा काटे यांनी विनंती केली. याच विनंतीचा मान राखत येत्या 25 नोव्हेंबरला नगरपालिका मैदानावर भिडे गुरुजी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे यांनी दिली.दिपक अण्णा काटे यांनी भिडे गुरुजींची भेट घेतल्यानंतर भिडे गुरुजींनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानला प्रेरणादायी ठरेल, असे ३२ मण (१२८० किलो) वजनाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सोन्याचे सिंहासन पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. या कार्यपुरतीचा कालावधी निश्चित करता येणार नाही. परंतु, राजकीय पक्ष किंवा नेत्यांची मदत घेणार नाही. आम्ही समाजासमोर हात पसरणार आहोत. याचबाबतची माहिती समाजाला व्हावी याच हेतूने इंदापूरमध्ये सर्वप्रथम एक सभा आयोजित केलेली असून या मार्गदर्शनपर सभेस सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहनही दिपक अण्णा काटे यांनी माध्यमांशी बोलताना केले.यावेळी रवी भाऊ नगरकर ( पिंपरी चिंचवड ),श्रेयस लांडे ( पिंपरी चिंचवड ), शिवभक्त निखिल भाऊ पिंजन ( देहूगाव ), अनिरुद्ध पवार ( इस्लामपूर, वाळवा ), अमोल सूर्यवंशी, पैलवान संजय जाधव ( इस्लामपूर ) इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.
Home Uncategorized शुक्रवारी संभाजी भिडे गुरुजी येणार इंदापुरात,नगरपालिका मैदानात होणार जय्यत मार्गदर्शन सभा- शिवधर्म...