आज इंदापूर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.शिवसेना शहर प्रमुख अशोक देवकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की,बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे.
शिवसेनेने 1984 साली भाजपसोबत युती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.अशा पद्धतीने सुरू झालेली राजकीय कारकीर्द ही वाढत संपूर्ण महाराष्ट्र भगवामय झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी एक नवी दिशा दिली आहे असे मत नूतन शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी इंदापूर येथील कार्यालयात त्यांना अभिवादन करताना व्यक्त केले.अण्णासाहेब काळे,धनंजय पवार,दुर्गा दादा शिदे,नागेश काळे,सुरज काळे,नामदेव हारणे,कांताभाऊ नगरे,दिपक सल्ले,गोरख ताटे,अविनाश खंडागळे,जाॅनबाबा सोनवणे,मोहन शिंदे,देवा मगर,हरुण बागवान,रमेश सांळुके,बालाजी पाटील,बबन खराडे,बाबू देवकर,शुभम पवार, रोहीत पवार, राहुल देवकर,रुपेश कांबळे इत्यादी बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.
Home Uncategorized बाळासाहेब ठाकरेंमुळेच राज्याच्या राजकारणाला नवी दिशा – शिवसेना शहराध्यक्ष अशोक देवकर