इंदापूर: गेल्या साधारण दीड महिन्यापासून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तथा अवैद्य कामगिरी करणाऱ्या लोकांच्या मुसक्या आवळण्यात माहीर असणारे दबंग अधिकारी टी.वाय. मुजावर हे सुट्टीवर आहेत. त्यांच्या सुट्टीचे कारण हे आजारपण आहे की त्यांची बदली झाली आहे हे चित्र मात्र अजून स्पष्ट झालेले दिसून येत नाही. परंतु याच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची उणीव मात्र इंदापूरकरांना नक्कीच भासत आहे.
खरंतर इंदापूर तालुक्याला पेट्रोलिंग म्हणजे काय? हेच मुजावर साहेबांनी आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते मुजावर साहेब सुट्टीवर जाण्यापर्यंत इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंगच्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले होते. प्रत्येक गल्लोगल्ली व सर्व अंतर्गत नागरिक वस्ती तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये व इतर सणावरात सर्व व्यापारी वर्गांच्या दारोदारी चालत जाऊन इंदापूर पोलिसांनी टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंगची उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत होते.. त्याचबरोबर इंदापूर पोलिस स्टेशनच्या ऑफिस परिसरातील साफसफाई ,स्वच्छता व रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने झाली असल्याने इंदापूर पोलिस स्टेशन हे एक सुसज्ज कार्यालय दिसत आहे एकूणच इंदापूर पोलीस हे इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले होते. पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून (सुट्टीवर जाण्याच्या आधी) इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत होती. गेल्या 5 महिन्यातच अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या 7 कारवाया याच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने केल्या असून यामध्ये आतापर्यंत तब्बल २ कोटी ८३ लाख रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत केला होता. सदर झालेल्या कारवाया या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कारवाया समजल्या जातात.अनेक चोरी प्रकरणे उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत होते.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून झाला होता. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वाहतूक नियंत्रण,कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांची टीम यशस्वी झालेली दिसून आली होती.अशा कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याचे साधारण गेल्या दीड महिन्यापासून अचानक सुट्टीवर जाणे हेच मुळात संशयास्पद आहे असे बोलले जात आहे.1 ऑक्टोबर 2022 ते 14 नोव्हेंबर 2022 या दीड महिन्याच्या कालावधीतच मुजावर साहेबांची उणीव नक्कीच जाणवत आहे कारण या दीड महिन्याच्या कालावधीत ते कार्यरत नसताना दरोडा,जबरी चोरी, घरफोडी,मोटरसायकल चोरी, शेती अवजारे चोरी, वाळू चोरी, मोबाईल चोरी या सर्व चोऱ्यांचा आलेख रॉकेट प्रमाणे उंचावला असून एकूण आकडा हा तब्बल 47 वर पोहोचला आहे.एकूणच या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची उणीव प्रत्येक इंदापूरकरांना जाणवत आहे. मुजावर साहेबांच्या सुट्टीचे कारण जरी आजारपण असले तरी ते लवकर बरे होऊन इंदापूरलाच रुजू व्हावेत अशीच इंदापूरकरांची अपेक्षा असेल.परंतु ते रुजू होतील की इंदापूरकरांच्यामध्ये सध्या चालू असलेल्या तर्कवितरकाप्रमाणे त्यांची बदली होईल यासाठी आणखी काही दिवस इंदापूरकरांना वाट पाहावी लागेल हे मात्र नक्की….
Home Uncategorized सामान्य जनतेच्या मनात घर केलेले इंदापूर पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी टी.वाय.मुजावर यांच्या...