महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक सत्ता परिवर्तन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडत भाजपाशी हात मिळवणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले होते.हे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात ठिक ठिकाणी समीकरणे बदलून उरल्या सुरल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून शिंदे गटामध्ये सामील होण्याची चक्रे चालूच होती परंतु यामध्ये आतापर्यंत इंदापूर तालुका हा अपवाद होता असे म्हणता येईल.
परंतु निमगाव केतकी येथे पालखी मार्गाच्या प्रश्नामुळे शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे आणि या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी व त्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे नेतेमंडळींनी येऊन भेट घेत आहेत.यातच शिवसेनेचे नूतन प्रवक्ते विजय बापू शिवतारे यांनीही निमगाव केतकी येथील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी येणार असल्याने उद्धव ठाकरे गटातील शिवसेना शहर संघटक अवधूत पाटील, युवासेना तालुका अधिकारी सचिन इंगळेे,उपशहर प्रमुख बालाजी पाटील व शाखाप्रमुख देवा मगर हे सुद्धा उपस्थित राहिले. शिंदे गटाचे प्रवक्ते शिवतारे बापू येणार असल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित झाले होते त्यामुळे याबाबत त्यांना विचारणा केली असता लवकरच आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहोत अशी माहिती मिळाली.एकंदरीतच इंदापूर शहरातील ठाकरे शिवसेनेला यामुळे धक्का बसणार असून प्रमुख पदाधिकारीच शिंदे गटात गेल्याने छोट्या प्रमाणात असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेनेला खिंडारच पडले असे म्हणता येईल.