वैभव पाटील: पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघरचे सुपुत्र प्राध्यापक राजेश विष्णू संखे यांचा मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिरात मानाचा व प्रतिष्ठेचा असा “भारत भूषण”हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सदरचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटने कडून देण्यात आला.हा पुरस्कार सन्माननीय डॉ. अविनाश सकुंडे ,मा राजेंद्र पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी कला,क्रीडा, साहित्य,वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.
प्रा.राजेश सर हे स्वतः उच्च शिक्षित असून सरांनी पत्रकारितेची पदवी सुद्धा संपादन केली आहे.सर विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन करण्याचे सुद्धा कार्य करत आहेत.
1997 पासून प्रा.राजेश सरांनी शिक्षण क्षेत्रात हायस्कूल शिक्षक, महाविद्यालय शिक्षक, आयटीआय शिक्षक, हायस्कूल सुपरवायझर, शाळा संचालक ,11वी व 12 वी आर्टस् आणि कॉमर्स चे कोच,स्पर्धा परीक्षा कोच,हायस्कूल व ज्यु. कॉलेज प्रिंसिपल म्हणून कार्य केले आहे.प्रा.राजेश सरांनी असंख्य विद्यार्थ्यांचे कौंसिलिंग करून त्यांना स्वतःचे करियर निवडण्यासाठी मदत केली आहे.
प्रा.राजेश सरांनी पार्थ अकॅडमी च्या माध्यमातून 2009 ते 2016 या कालावधीत पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांना MPSC व इतर तत्सम स्पर्धा परिक्षेबाबत मोफत मार्गदर्शन केले आहे.पार्थ अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत 11 विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तर 5 जण खात्यांतर्गत फौजदार म्हणून,डी.एड टीइटी क्लासच्या माध्यमातून 5 2जण शिक्षक म्हणून निवडले गेले आहेंत. काही विद्यार्थ्यांनी MPSC/PSI/STI/ASST ची पूर्वपरीक्षा क्वालिफाय केलेली आहे.पार्थ अकॅडमी च्या माध्यमातून तलाठी व ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा कलासेस घेण्यात आलेले आहेत.
सामाजिक कार्यात सुद्धा प्रा.राजेश सरांनी गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम केले आहे व करत आहेत.
प्रा.राजेश सरांच्या मागील 25 वर्षांपासून केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव म्हणून सरांना अत्यंत मानाचा असा “भारत भूषण”हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.प्रा.राजेश सरांनी या पुरस्काराबद्दल आई,वडील, पत्नी ,मुलगी, स्वर्गीय पार्थ ,असंख्य हितचिंतक व मित्रांचे आभार मानले आहे.या पुरस्काराबद्दल पालघर जिल्ह्यात सर्वत्र प्रा.राजेश सरांची प्रशंसा केली जात आहे.