👉 इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळाचा कारभार आदर्शवत.
अहमदनगर जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेवर निवडून आलेले नूतन विद्यमान चेअरमन संदिप मोटे,संचालक महेश भनभने,संचालक बाळासाहेब कापसे ,संचालक सुर्यकांत काळे यांचा सत्कार इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना चेअरमन संदिप मोटेम्हणाले की इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा कारभार आदर्शवत आहे.भविष्यात नगर जिल्हा शिक्षक बँक आणि इंदापूर शिक्षक पतसंस्था शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातात हात घालून काम करेल.इंदापूर शिक्षक पतसंस्थेचे संचालक मिटींगचा भत्ता घेत नाहीत. सभासदांच्या चहापानाचा खर्च, पतसंस्थेतील सत्काराचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. हे धोरण काटकसरीचे आहे.इतर पतसंस्थांनी सुद्धा याचा आदर्श घेतला पाहिजे. नगर जिल्हा शिक्षक बँकेचा कारभार पाहण्यासाठी सर्व संचालकांनी नगरला यावे. संस्था स्वभांडवली करण्यासाठी सभासद ठेवी घेण्याबरोबरच सभासदांच्या नातेवाईकांच्या ही ठेवी घ्याव्यात.भविष्यात इंदापूर पतसंस्थेचा नावलौकिक राज्यात नक्कीच होईल.यावेळी कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष व संचालक ,सुहास मोरे,संचालक दत्तात्रय ठोंबरे,संचालक बालाजी कलवले,संचालक सतीश दराडे ,संचालक प्रशांत घुले,संतोष शिंदे , सचिन वारे , उज्ज्वल कुमार सुतार उपस्थित होते.सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक संचालक सचिन देवडे यांनी केले.
Home Uncategorized इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा काटकसरपणा हा इतर संस्थांसाठी आदर्शवत – संदीप...