पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. काढणीस आलेली पिके सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच होत्याचं नव्हतं झालेलं आहे. दिवसभर शेतामध्ये राब राब राबवायचं, त्या पिकांसाठी अतोनात खर्च करायचा, खते औषधाच्या किमती तर जवळपास दुपटीने वाढले आहेत या महागाईमुळेच अगोदर शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे, आणि त्यातूनच ही अतिवृष्टी. अहो एवढेच नव्हे तर शेतकरी वर्ग हा शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकावर आपल्या आयुष्याची, प्रपंचाची स्वप्न रंगवत असतो ,पण असे जेव्हा अतिवृष्टीचे संकट उभे राहते आणि हाता तोंडाला आलेला घास आपल्या डोळ्यासमोर वाहून जातो तेव्हा शेतकऱ्यांना काय वाटत असेल, त्यांच्या डोळ्यातील अश्रू कोण पुसणार, प्रशासनाने नुकसान भरपाई दिली तर खूपच कमी असते त्यापेक्षा त्या पिकाला शेतकऱ्यांनी खर्च केलेला दहा पटीने मोठा असतो. कोणत्याही पिकाला हमीभाव नाही .शेतकऱ्यांना पिकवता येते पण विकायला येत नाही अशीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची एकजूट झाली नाही तर शेतकरी टिकणार नाही. आत्महत्या वाढतील ,त्यामुळे शेतकऱ्यांनो शेतकरी संघटनेत एकजुटीने सहभागी व्हा. असे शेतकरी संघटना युवक आघाडी तालुकाध्यक्ष सचिन कोथमीरे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बोलताना मत व्यक्त केले .शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २८|१०|२०२२ रोजी नायब तहसीलदार ठोंबरे साहेब यांना पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करावे आणि तसे आदेश गावकामगार तलाठी यांना देण्यात यावेत असे निवेदन दिले आहे .निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन निर्णय ची सीएलएस२०२२/५२/२९९/म.३ हा दिनांक १३ऑक्टोंबर २०२२ रोजी शासन निर्णय झालेला असून त्याची अंमलबजावणी त्वरित करावी व त्यासाठी तुमच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील सर्व गाव कामगार तलाठी यांना नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी आदेश दिले जावेत असे निवेदन शेतकरी संघटनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे दादा किरकत, मंगेश घाडगे, गुलाबराव फलफले ,तुकाराम निंबाळकर ,सचिन जगताप उपस्थित होते.
Home Uncategorized पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करा – सचिन कोथमिरे (शेतकरी संघटना)