दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस व व्यवसायाभिमुख भेटवस्तूंचे वाटप,देवराज उद्योग समूहाचा अनोखा उपक्रम.

उपसंपादक: निलकंठ भोंग
देवराज फ्रुट प्रा. लि. व देवराज दूध डेअरी यांच्या वतीने शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस व व्यवसायाभिमुख भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. देवराज उद्योग समूहात काम करणाऱ्या शेकडो कामगारांना बोनस व कपडे दिवाळी निमित्त भेट देत त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या उद्योग समुहा मार्फत करण्यात आला.
यावेळी बोलताना देवराज दूध डेअरीचे चेअरमन तुषार (बाबा) जाधव यांनी सांगितले की, सध्या या डेअरी मध्ये सात ते आठ हजारापर्यंत दूध संकलन होत असून पुढील वर्षापर्यंत वीस हजार संकलन होण्याचा आमचा माणस असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा मिळेल याकडेही लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी उपसभापती देवराज (भाऊ) जाधव, माजी उपसरपंच अशोक मिसाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य ॲड.सुभाष भोंग, अनिल भोंग, हनुमंत राऊत, दादा पाटील, प्रहार संघटनेचे संजय राऊत, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ खराडे, पै. संतोष जाधव, विनोद डोंगरे, विजय हेगडे, राजकुमार जठार, ग्रामस्थ तसेच दूध उत्पादन शेतकरी देवराज उद्योग समूहात काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here