शिरसटवाडी: शिरसाटवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये डेंग्यूची साथ चालू आहे. गावातील असणाऱ्या अस्वच्छतेमुळे व गावास पिण्याच्या पाण्याची विहीर ही नाल्याच्या शेजारी असल्याने याचा प्रादुर्भाव ज्यादा प्रमाणात होत आहे त्याचप्रमाणे वीस ते पंचवीस दिवस ग्रामपंचायतीने नागरिकांना आवश्यक असणारे आरओ चे पाणी मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ होत आहे. शिरसाटवाडी ग्रामपंचायत लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या आरोचा संच हा धुळ खात पडलेला आहे. त्यामुळे साधने असूनही फक्त दुर्लक्षतेमुळेच शिरसटवाडीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे असा गंभीर आरोप शिवसेना नेते ॲड. नितीन कदम यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की,डासांचा प्रादुर्भाव व इतर रोगराई पासून संरक्षण होण्यासाठी ग्रामपंचायतीने फवारणी यंत्र उपलब्ध केले असून ते फवारणी यंत्र सुद्धा धूळ खात पडले आहे.
नागरिकांनी दिलेल्या करस्वरूपी पैशांमध्ये नागरिकांचे आरोग्य सुविधा सुधारण्याचे काम प्रामुख्याने ग्रामसेवक,सरपंच व उपसरपंच त्याचप्रमाणे सदस्य यांच्यावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामस्थांची गैरसोयी टाळावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या समोर शिवसेनेच्या वतीने तीव्र घंटानाद आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामास ग्रामपंचायत व पदाधिकारी जबाबदारी असतील असे ॲड नितीन कदम यांनी जनता एक्सप्रेस मराठी बोलताना सांगितले आहे.
Home Uncategorized आरोग्य सुविधा व पाणीपुरवठाच्या दुरावस्थेमुळे शिरसटवाडी ग्रामस्थ त्रस्त, सुधारणा न झाल्यास शिवसेनेचा...