इंदापूर तालुक्यातील रुग्णांसाठी दत्तामामा ठरत आहेत आरोग्यदूत,सणसर येथील अजित काळेचे तब्बल 5 लाख 25 हजार रुपयांचे ऑपरेशन झाले मोफत.

इंदापूर:माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे विकासकामांच्या बाबतीत महाराष्ट्रभर परिचीत झाले आहेत,त्यांनी इंदापूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे हे सबंध तालुकावासिय मोठ्या अभिमानाने सांगत आहेत ही दत्तामामांच्या कर्तृत्वाची पावती आहेच,परंतु यामध्ये अजून एका कामाची भर पडली आहे, ती म्हणजे “आरोग्यसेवा”….!! होय,श्री.भरणे यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील हजारो गरजु रूग्णांवर पुणे-मुबंई येथील मोठ-मोठ्या हॉस्पिटल मध्ये अगदी मोफत उपचार होत आहेत,त्यामुळे अनेक रूणांसहीत कुटूंबियांना खूप मोठा आधार मिळत आहे.
गोरगरिब,सामान्य जनांना आपल्या अर्थिक परस्थितीमुळे अनेक गंभीर आजांरावर मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊन महागडे उपचार करणे जिकरीचे असते,सामान्यांची हिच अडचण लक्षात घेऊन दत्तामामांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला खात्रीशीर व मोफत उपचार मिळावेत यासाठी पुणे-मुबंई येथील प्रसिद्ध दवाखान्यातील तज्ञ डॉक्टरांकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याने गरजुंवर यशस्वीपणे उपचार होत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होत आहेत.
दोन दिवसांपुर्वी सणसर येथील अजित बाळासाहेब काळे हे गुडघ्याच्या आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त होते,दत्तामामांच्या प्रयत्नामुळे त्यांची गुडघ्यावरील शस्त्रक्रिया अगदी मोफत पार पडली असून त्यांचे जवळपास पाच लाख रूपये वाचले आहे.त्यामुळे दत्तामामांमुळे तालुक्यातील हजारो गरजूंना मोठा आधार मिळत आहे. 👉आमदार दत्तामामांच्या एका फोनने तरूणावर मोफत उपचार…होय.. विकास नगरेसाठी दत्तामामादेवदूतच लिंक👉 https://janataexpressmarathinews.com/आमदार-दत्तामामांच्या-एका/
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here