गॅलेक्सी स्कॅन सेंटर या अद्यावत सिटीस्कॅन सेंटरचे उद्या डॉ. एम.के.इनामदार यांच्या हस्ते शुभारंभ.

👉 इंदापूरात प्रथमच अद्यावत सिटी स्कॅन सेंटर उभारल्यामुळे गरजूंना सुविधेसाठी बाहेरगावी जाण्याची गरज संपली.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील व परिसरातील रुग्णांच्या सेवेकरिता गॅलेक्सी स्कॅन सेंटर या अद्यावत सिटी सेंटरचा उद्या शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता मा.डॉ. एम के इनामदार, (हृदयरोग तज्ञ,अकलूज) यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.इंदापूर शहरांमध्ये संविधान चौकाच्या लगत विद्यानंद सहकारी बँकेच्या खालच्या मजल्यावर महावीर हाइट्स इंदापूर येथे ही सुविधा चालू केली आहे. इंदापूरचे डॉ. अभिजीत ठोंबरे,वालचंदनगरचे डॉ.रोहित कांडलकर अकलूजचे डॉ.प्रवीण मिसाळ व बारामतीचे डॉ.प्रवीण गायकवाड या चारही तज्ञ डॉक्टरांनी मिळून गॅलेक्सी स्कॅन सेंटर या अद्यावत सिटीस्कॅन सेंटरची स्थापना केली आहे.उद्या होणाऱ्या या शुभारंभ कार्यक्रमास डॉ. राम अरणकर,डॉ.श्रेणिक शहा,डॉ.एसटी शहा,डॉ. सुभाष लांबतुरे,डॉ. अविनाश पानबुडे ,डॉ.सुरेखा पोळ,डॉ. संदेश शहा,डॉ. एल एस कदम,डॉ. किसन शेंडे,डॉ. दत्तात्रय गार्डे नामदेव गार्डे,डॉ. संजीव हेगडे ,डॉ.संजय देशमुख,डॉ. उदय आजोतीकर,डॉ.सी ए पाटील,डॉ. एकनाथ चंदनशिवे ,डॉ.के जे व्होरकाटे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे अशी माहिती गॅलेक्सी कॅन सेंटरचे मॅनेजर श्री शेंडे यांनी दिली.
सीटी म्हणजे कॉम्प्युटराइज्ड एक्सियल टोमोग्राफी (सीएटीसुद्धा म्हणतात).. सीटी स्कॅन ही तंत्रप्रणाली एक्स-रेचा पुढचा टप्पा आहे. एक्स-रेमध्ये एकाच दिशेने क्ष-किरण सोडले जाऊन त्या माध्यमातून शरीराच्या विशिष्ट भागाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे एक्स-रेच्या माध्यमातून न्युमोनिआ, अस्थिभंग अशा हाडांशी संबंधित आजारांचे निदान करणे शक्य आहे.
मेंदूच्या आजारासह मान, मणका, छाती, ओटीपोट, पोट आदी भागांमधील आजारांच्या निदानासाठी सीटी स्कॅनद्वारे तपासणी केली जाते.
मानवी शरीररचना अत्यंत जटिल आहे. तेव्हा ही जटिल व्यवस्था अंतर्भागातून कशी दिसते हे समजल्याशिवाय आजारांचे निदान करणे शक्य नाही. शरीर हे त्रिमितीय मात्र एक्स-रे द्विमितीय येतो. त्यामुळे एक्स-रे तपासणीमधून निदान करताना मर्यादा येतात. एक्स-रे तंत्राचा पुढचा टप्पा म्हणून सीटी स्कॅन तंत्रप्रणाली उदयाला आली. सीटी स्कॅनमध्ये विविध बाजूंनी क्ष-किरण सोडले जाऊन शरीराच्या अंतर्भागाची विविध अंगांनी छायाचित्रे घेतली जातात. संगणकाच्या साहाय्याने या छायाचित्रांच्या माध्यमातून शरीरातील विविध भागांचे त्रिमितीय स्वरूप पाहता येते आणि त्याद्वारे शरीरातील अंतर्भागाचे परीक्षण करता येते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here