दौंड तालुक्यातील दौंड-पाटस महामार्गालगत असलेल स्वच्छ सुंदर पुरस्कृत बिरोबावाडी गाव,या गावच वैशिष्ट्य श्री बिरोबा देवाची जत्रा, गावाच्या उजव्या बाजुस असणार श्री बिरोबा मंदिर प्रवास करताना लक्ष वेधून घेत..! चिरेबंदी दगडी कोरीव काम, तसेच सभा मंडप देवांच वाहन सुंदर अश्व लक्ष वेधून घेत गाभाऱ्यात श्रींची दगडी कोरीव मुर्ती पाहता क्षणी आपोआप हात जोडले जातात.
यंदा श्री बिरोबांची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आश्विन कोजागरी पौर्णिमा दि. 8/10/22 ते 9 /10/22 यादिवशी यात्रोत्सव असुन ग्रामस्थांकडून सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे.नवसाला पावणारा श्री बिरोबा देव याची सर्व दुर ख्याती आहे.
👉 दि. 8/10/22
पहाटे श्रींना दुग्धाभिषेकाने यात्रेची सुरूवात सकाळी 6वाजता होमहवन यज्ञ कार्यक्रम, तसेच श्रींची आरती,
अकरा वाजता लाडक्या भक्तांकडून व ग्रामस्थांकडून श्रींना दंडवत, शेरमी (पेढे वाटप, तसेच पुरणपोळीचा नैवेद्य).
दुपारी बारा वाजता ढोल ताशांच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करीत श्रींची मंदिर प्रदक्षिणा ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत छबिना मिरवणुक, सायंकाळी 7 वाजता पाच दिवसीय घटस्थापनेच विसर्जन सात वाजता श्रींची आरती 8 वाजता श्रींची पारंपरिक ढोल गजे नृत्य फटक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक. रात्री 11 नंतर लोकनाट्य मंगला बनसोडे तमाशा मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
👉 दिनांक 9/10/22
पहाटे अभिषेक पुजा आरती, त्यानंतर श्रींना बकरा बळी देण्यात येतो. दुपारी बारा वाजता श्रींचा छबिना मंदीर प्रदक्षिणा व संचार भाकणुकीचा कार्यक्रम.
👉 नवस:-
पारणे, श्रींना हार तोरण तसेच नवस फेडण्या साठी देवाला चांदीचा घोडाही वाहीला जातो. मंदीराचे पुजारी येडे बंधु आहेत. वरील कार्यक्रम व त्याची भव्यता यातुनच जत्रेचा उत्साह समजतो.
👉 अख्यायिका :-
श्री बिरोबा देव या गावात कसे आले भक्तांच्या हाकेला धावणारा श्री बिरोबा देव व त्यांची अख्यायिका
श्री बिरोबा देवांचा एक निस्सीम भक्त जेल मध्ये अटक होता त्याने देवाला हात जोडले व त्याचा धावा करू लागला तुझी जत्रा आली आहे मी जेल मध्ये तु जर मला जत्रेला येथुन घेऊन गेला तर, मी तुला माझ शिर वाहीन.भक्ताच्या हाकेला धावणारा व पावणारा देव श्री बिरोबा यांनी आपल्या लाडक्या भक्ताला घोड्यावर बसवल व त्या भक्ताच्या गावी प्रस्थान ठेवल प्रवास करत असता भक्तास खुप तहान लागली. त्याने देवाला सागितले देवा मला खुप तहान लागली आहे त्याक्षणी देवाने घोडा थांबवुन जमिनीत उकरायला सांगितल तेथे पाण्याचा झरा लागला भक्ताची तहान अशी वाढली की ओंजळीत पाणी पिता पिता त्याने झऱ्याला तोंड लावल पाणी उष्ट झाल देव त्या क्षणी गुप्त झाले. ते ठिकाण दौंड तालुक्यातील श्री क्षेत्र वाघाळे (गिरीम) येथे डोंगर माथ्यावर आहे आजही जीवंत पाणी देवाच मुळ ठाण येथे आहे.
भक्त एकटाच आपल्या गावी आला झालेली हकिकत भाकणुक संचार करून त्याने आपल्या गावाला सांगितली. व नवस बोलल्या प्रमाणे भक्ताने आपले शिर देवाला वाहीले. देवाचा नवस पुर्ण केला. आजही श्रींच्या मंदिरात प्रतिकात्मक शिराची मुर्ती पाहावयास मिळते. याच शिराची पुजा अर्चा करून यात्रोत्सव सुरू होतो. अशी अख्यायिका श्री बिरोबा देवांची सांगितली जाते.
बिरोबावाडी स्वच्छ सुंदर व आदर्श सरपंच पुरस्कृत गाव गावातील ग्रामस्थ संयमी व शांत सर्व गुण्या गोविंदाने गावात राहतात. ग्रामस्थांची असलेली देवाची भक्ती, व देवाची शक्ती दोन्हींचा गावात असलेला उत्साह यामुळेच गावाची आर्थिक सामाजिक वैचारिक भरभराट खुप छान होत आहे. नवसाला पावणारा श्री बिरोबा देव कधी एकदा आपल्या गावची जत्रा येते अस होत. यात्रेच्या महीन्या पूर्वीच श्री बिरोबा देवाना ग्रामस्थ रोज प्रत्येक जण जलाभिषेक करीत असतो. भक्तांच्या मनातील उत्साह उमेद चैतन्य तसेच जलाभिषेक केल्याच पुण्य व आनंद भक्तांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत असतो. पंचक्रोशीतील भाविक भक्त व तालुक्याची भरभराट श्री बिरोबा देवांच्या कृपेने अशीच होत राहो हीच श्री बिरोबा चरणी प्रार्थना भक्तजन करत आहेत.
Home Uncategorized बिरोबाच्या नावान चांगभल…! दौंड तालुक्यातील बिरोबावाडी गावची यात्रा मोठ्या उत्सवात साजरी होणार..