श्री हनुमान विद्यालय अवसरीच्या माजी मुख्याध्यापिका सौ विजया शिंगटे यांचा नवदुर्गा सन्मानाने गौरव.  

इंदापूर तालुक्यातील अवसरी मधील श्री. हनुमान विद्यालय अवसरी या विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. विजया शिंगटे यांना नवरात्र उत्सवाचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने नवदुर्गा सन्मानाने सन्मानित करण्यात आले .भारत मातेची प्रतिमा, सन्मानपत्र ,शाल व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान श्री. हनुमान विद्यालय अवसरी चे अध्यक्ष श्री .अरुण शिंगटे इंदापूर तालुका कार्यवाह घळके सर, सुरेश जकाते ,वैभव देशमाने ,डॉ. नागेश शिंदे ,हरिदास कवितके ,राजेंद्र पेंडवळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजया शिंगटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पैलवत समाजाला महत्त्वपूर्ण असलेल्या आरोग्य सेवेसी निगडित “आरोग्य सेविका “म्हणून काम करत आदर्शवत सेवेचे वृत्त पार पाडून आदर्श निर्माण केला. त्यानंतरचे पुढील शिक्षण घेऊन, ग्रामीण भागातील इंदापूर पासून नऊ दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अवसरीसारख्या अत्यंत ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोणतेही साधन नव्हते ,अशा परिस्थितीत अवसरी, बेडशिंगे ,भांडगाव सारख्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी श्री हनुमान विद्यालयाची निर्मिती केली व त्याचमुळे अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील मुला मुलींना शिक्षण घेता आले.मुली सुद्धा शिक्षणापासून वंचित राहू शकल्या नाहीत. विद्यालयातील शिक्षक स्टॉप ही अतिशय अभ्यासू आहे आणि याच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून 22 वर्ष अखंड सेवेचे यशस्वीपणे वृत्त त्यांनी पार पाडले. अतिशय शिस्तबद्ध आणि मुला मुलींना शिक्षणाचे वळण लावले. बळीराजांच्या लेकरासाठी हे विद्यालय वरदानच ठरले आहे .या विद्यालयातील मुलं मुली सुद्धा शिक्षण घेऊन क्लासवन अधिकारी, वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावरती मुला मुलींना नोकरीही लागल्या आहेत. आणि याच विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका विजया शिंगटे एक आदर्श शिक्षिका ,आदर्श मुख्याध्यापिका ,आदर्श माता ,म्हणून सर्व समाजामध्ये नावलौकिक मिळवला आहे .आणि त्याचमुळे त्यांना मातृशक्तीचा नवदुर्गा सन्मानाने गौरविण्यात आले आहे .जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून त्यांना शुभेच्छा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here