इंदापूर तालुक्यातून दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवसैनिक शिवतीर्थाकडे रवाना.. दसरा मेळाव्याच्या भाषणात कोणती नवी हत्यार उपसली जातील याबद्दल सर्वत्र कुतूहल.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांचे इंदापूर वरून आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिक व पदाधिकारी शिवतीर्थाकडे रवाना झाले आहेत.
या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रतिसाद मिळताना दिसतोय याचाच एक भाग इंदापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांनी आज सकाळी मुंबईकडे प्रस्थान केलेले आहे. खरंतर इंदापूर तालुक्यातील शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरे यांचीच असून शिंदे गटाची शिवसेना इंदापूर तालुक्यात नसल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.तालुकाप्रमुख नितीन शिंदे, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, भीमराव आप्पा भोसले, मेजर महादेव सोमवंशी यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी आहेत. यावेळी इंदापूर तालुका शिवसेनेसाठी खास आकर्षण असणार आहे ते राष्ट्रवादीतून जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे हे सुद्धा दसरा मेळाव्यासाठी मार्गस्थ झालेले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे यंदा प्रथमच दसऱ्याला दोन मेळावे होत आहेत. दोन्ही गट आपल्या मेळाव्यात विक्रमी गर्दी होईल, असा दावा करत असल्याने पोलिसांवरील ताणही वाढणार आहे.खरी शिवसेना कुणाची, याचा फैसला निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर प्रलंबित असताना ठाकरे आणि शिंदे या मेळाव्यांच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाच्या पातळीवर उतरले आहेत.
शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवसेनेचा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होत आहे. बीकेसी मैदानाची आसनक्षमता एक ते सव्वा लाख असली तरी शिंदे गटाने किमान 5 लाख कार्यकर्ते मुंबईत धडकतील इतक्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. शिवाजी पार्कची बैठक क्षमता 80 हजार ते 1 लाख असली तरी तिथेही मैदान ओसंडून गर्दी उरेल अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनीही शक्य तितक्या गाड्या बुक करून शिवसैनिकांच्या प्रवासाची सोय केली आहे, तर मुंबईत या शिवसैनिकांसाठी सोयी-सुविधांची जय्यत तयारी शिवसेनेच्या शाखांनी केलेली दिसते.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकांना साद घालत मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही खास निमंत्रण आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करून ते व्हायरल केले आहे. एकूण तयारी पाहता शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही मैदानांवरील दसरा मेळावे दणदणीत होण्याची चिन्हे आहेत. आता महाराष्ट्राचे लक्ष आहे ते ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणांकडे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी करत भाजपसह सत्तांतर घडवले आणि त्यात शिवसेनेची दोन शकले उडाली. गेले चार महिने हे दोन्ही गट एकमेकांवर सतत तुटून पडत असताना आता दसरा मेळाव्यातील भाषणात कोणती नवी हत्यारे उपसली जातात, याबद्दल राज्यभर प्रचंड कुतूहल आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here