विद्या निकेतन फार्मसी कॉलेज, लाखेवाडी येथे प्रथम वर्ष बी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाकरिता सुविधा व मार्गदर्शन केंद्र( एफ. सी. सेन्टर ) सुरू

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्मसी) व पदवी बी.फार्मसी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीच्या प्रथम वर्ष बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीयभूत प्रवेशकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज़ नोंदनी व मूल कागदपत्र तपासनी करिता महाराष्ट्र शासनाकडून महाविद्यालयाला *अर्ज सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) म्हणून मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मा.श्री श्रीमंत ढोले सर यांनी दिली.या केंद्रामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे कागदपत्रे व संपूर्ण प्रवेश प्रक्रिया याबद्दल सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे. या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी 👉 https://ph2022.mahacet.org/StaticPages/HomePage या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी व अर्ज नोंदणी झाल्यानंतर अर्ज व मूल कागदपत्र पडताळणी साठी व निश्चितीसाठी सुविधा केंद्रावर जाणे बंधनकारक आहे.
या सुविधा केंद्रांमध्ये बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदवी बी.फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक 28 सप्टेंबर 2022 ते 03 ऑक्टोबर 2022 दरम्यान स्वीकारले जाणार आहेत.या सुविधा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी होणार आहे.तरी विद्यार्थ्यांनी कॉलेजवर येताना आपली ओरिजनल कागदपत्रे व दोन प्रती झेरॉक्स घेऊन येणे.ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत सखोल मार्गदर्शन या महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकाँमार्फत उपलब्ध होणार आहे .तरी विद्यार्थ्यांनी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री .श्रीमंत ढोले सर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर सर 9011918989  नंबर वर संपर्क साधावा

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here