कुर्डूवाडीमध्ये मुस्लिम स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य..

कुर्डुवाडी दि.२२ (प्रतिनिधी)
मुस्लिम स्मशानभूमीत स्वच्छता,फवारणी करण्याबरोबर पाण्याची व बसण्याची व्यवस्था करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कुर्डुवाडी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरप्रमुख फिरोज खान यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत प्रांताधिकारी तथा प्रशासक ज्योती कदम यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले की मागील गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम स्मशानभूमी विविध समस्येने ग्रासली आहे अस्ताव्यस्त पडलेल्या झाडाझुडप्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच या दुर्गंधीमुळे जवळपासच्या शाळा महाविद्यालयात डेंग्यूचा फैलाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे प्रशासक तात्कालीन नगराध्यक्ष अधिकारी लक्ष देणार तरी केव्हा..? अशा प्रतिक्रिया समाजबांधवा कडून व्यक्त होत आहेत
नगर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुुळे स्मशानभूमीच्या द्वाराजवळ जाणे जिकरीचे झाले आहे जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या आरोग्य खात्याचा स्वच्छतेच्या बाबतीत विसर पडला असावा असे समजते दर शुक्रवारी नमाज पठणा नंतर मुस्लिम बांधव बहुसंख्येने कब्रस्थानाकडे जातात त्यावेळी हातपाय धुणे गरजेचे असून पाण्याची गरज भासते प्रत्येकवेळी बोरच्या पाण्याचा वापर करणे ही खर्चीक बाब आहे पालिकेने पाण्याच्या व्यवस्थेसह सुसज्ज बैठक व्यवस्था दरमहा मिळणाऱ्या निधीतून करावी जेणे करून दफनविधीच्या वेळी लोकांना ताटकळत उभे रहावे लागणार नाही आणि गैरसोयही होत नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here