👉कुणबी सेनेने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करण्याची दिली ग्वाही.
वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी
दि. 14 सप्टेंबर कुणबी सेना युवा दला तर्फे पालघर व सफाळे घाटातील समस्यांबाबत वनविभागाला निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने विषय क्र.१ मनोर – पालघर मार्गावरील पालघर घाटातील (वाघोबा खींड)आंब्याच्या सुकलेल्या धोकादायक झाडाची तात्काळ योग्य रित्या विल्हेवाट लावणे बाबत. विषय क्र.२ वन्यप्राण्यांना चुकीच्या पद्धतीने रस्त्यामध्ये टाकण्यात येणारे खाद्य पदार्थ टाकल्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याबाबत. या दोन विषयांबाबत निवेदन देण्यात आले.
त्यानंतर पालघर घाटासंदर्भात वनक्षेत्रपाल अधिकारी गणेश परहार साहेब यांना निवेदन देण्यात आले. पालघर घाटातील सुकलेल्या आंबाच्या झाडाची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी झाडाच्या बाजूला असलेल्या महावितरणची विद्युत पुरवठा वाहिनी असल्यामुळे महावितरणला सुद्धा सूचित करण्यात आले. तसेच, त्या संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेण्यात आली. सर्व संबंधितांसोबत चर्चेनंतर वनविभागाने येत्या शुक्रवारी दि. १६/०९/२०२२ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सदर झाडाची विल्हेवाट लावण्यात येईल. तसेच वन्यप्राण्यांना चुकीच्या पद्धतीने टाकत असलेल्या खाद्य पदार्था बाबत सूचना फलक लावण्यात येतील व पहारेकरी नेमण्यात येईल. शिवाय, खाद्य पदार्थ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे वनक्षेत्रपाल अधिकारी परहार साहेबांकडून आश्वासन देण्यात आले. यात सोबत जंगलात वणवा लागणे, वन दावे, प्लॉट वाटप वा काळदुर्ग पायथ्याशी चौकी अशा वनविभागाबाबतच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
निवेदन देण्यासाठी कुणबी सेनेचे पालघर तालुका प्रमुख अरविंद कंडी, युवादलाचे जिल्हा प्रमुख कल्पेश ठाकरे, पालघर तालुका कुणबी सेना उपाध्यक्ष रमाकांत सोगले, नितीन पाटील (वाडा),आत्माराम भोईर(वाडा), दिपेश पाटील,जयेश पाटील,प्रकाश शेलार,गणेश नाईक,भूषण सातवी,जयदीप पाटील, संकेत पाटील,आकाश पाटील, हार्दिक पाटील, महेंद्र मोरे, कल्पक ठाकूर, रोहित पाटील, तुषार पाटील, ऋषिकेश पाटील, ऋतिक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Home ताज्या-घडामोडी कुणबी सेना युवा दला तर्फे पालघर व सफाळे घाटातील समस्यांबाबत वनविभागाला लक्षवेधी...