आपल्या बेधडक आणि खास शैलीत लाखो लोकांची मने जिंकणारे अजित दादा पवार यांना दिल्लीमध्ये भाषण न करू दिल्याने ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा आज दिवसभरात रंगली होती. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजितदादांची काही खदखद आहे का? त्यांना डावलले जात आहे का? नक्की दादांना विरोध कोणाचा? दादांचा स्पष्टवक्तेपणा कोणाला आवडत नाही? असे अनेक प्रश्नांची चर्चा आज दिवसभर जनमानसात होती. याबाबत सविस्तर असे की, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात नाराजी नाट्य पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.कारण, कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार हे व्यासपीठावरुन तडकाफडकी निघून गेले. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडला आणि मीडियाच्या कॅमेऱ्यातही हे सर्व दृश्य कैद झाली आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. या अधिवेशनात सर्व नेत्यांची भाषणे सुरू होती. मात्र, अजित पवार यांनी भाषण न करताच ते तडकाफडकी व्यासपीठावरुन निघून गेले.