बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचा प्रभाव असलेले हमीद भाई आतार हे एक निस्वार्थी व्यक्तिमत्व- धनंजय कळमकर

इदापूर शहराला एक ऐतिहासिक वारसा आहेे.छत्रपती मालोजीराजेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये एकात्मतेची भावना रुजलेली आहे. आणि हीच एकात्मता जपण्याचे कार्य इंदापूर मधील हमीदभाई आतार करीत आहेत.आज त्यांचा वाढदिवस असल्याने नेहमीच प्रसिद्धीच्या माध्यमापासून दूर राहिलेल्या हमीदभाईंची ही छोटीशी ओळख या लेखांमधून व्यक्त करत आहोत.इंदापूर शहरात मुस्लिम समाजात एका गरीब कुटुंबात हमीदभाईंचा जन्म ९ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील शिक्षणाची आवड,जिज्ञासा आणि जिद्दीच्या जोरावर हमीदभाईंनी वाणिज्य शाखेतून M.COM.पर्यंत शिक्षण घेतले. कोणतीही नोकरी अथवा कोणाची चाकरी न करता काहीतरी उद्योगधंदा करण्याची मनामध्ये प्रचंड इच्छा होती. परंतू बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे पारंपरिक व्यवसाय करण्यात हमीदभार्ईनी धन्यता मानली. त्यांची कुटुंबाला मदत होऊ लागली.एवढ्यावरच स्वस्थ न बसता सामाजिक कार्याची आवड असल्याने हमीदभाईंच्या मनाची घालमेल दिसून येत होतीकोणताही सामाजिक अथवा राजकीय वारसा नसणाऱ्या नम्र, शांत स्वभाव, उच्च शिक्षित असणाऱ्या हमीदभाईंनी सामाजिक कार्यात उडी घेतली.पुढे हमीदभाई सायराभाभींशी सन.१९९० साली विवाहबद्ध झाले.ह्या उभयतांना दोन अपत्य असून दोन्ही मुलीचं आहे. मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव न करता मुलींना पोस्ट ग्रज्युएट पर्यंत शिक्षण पुणे, कोल्हापूर ह्या ठिकाणी दिले. हमीद भाईंवर बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचा प्रभाव असल्याने सर्वधर्म समभाव या न्यायाने समाजात वावरणारे हमीदभाई सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागतात. कोणत्याही संघटनेशी ,पक्षाशी राजकीय मतभेद नसणाऱ्यांपैकी एक हमीदभाई. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे हमीद भाईचे वर्गमित्र आहेत. मुकुंदशेठ शहा यांच्याशी मैत्रीचे नाते घट्ट आहे. डॉ . सु . ना . कुलकर्णी यांचे मार्गदर्शन दिवंगत रत्नाकर मखरे (तात्या) यांच्याशी शेवट पर्यंत मैत्री जपली. निस्वार्थपणे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध जपले. मैत्रीचे बंध टिकवले.कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश भाईंनी केला नाहीइंदापूर शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे ह ह .चांदशाहवली बाबा दर्गाचे प्रमूख मानकरी ,तसेच श्री. सिद्धेश्वर मंदिर, श्री.लक्ष्मी आई देवी मंदिर या ठिकाणी हमीद भाईंना मान आहे .पत्नी सायरा आतार (भाभी) यांनी सहेली ब्युटी पार्लरच्या माध्यमातून महिलांशी स्नेह वाढवत समाज हिताच्या कार्याला सुरुवात केली.ह्या दोघांनीही निस्वार्थ भावनेने शहरातील गोरंगरीब ,गरजूंना मदत केली.कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सामाजिक जाणिवेतून गरजू,गरीब व निराधार महिलांना अन्न धान्याचे किट हमीदभाईनी शहरात वाटप केले. मदतीचा हात पुढे करत आपल्या निःस्वार्थ भावनेने आपल्या कामाने खऱ्या अर्थाने इंदापूर शहरात सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख भाईंनी निर्माण केली. भाई तुमच्या हातून भविष्यात देखील असेच समाज कार्य घडत राहो, हीच सदिच्छा !!

समाजसेवक हमीदभाईना 59 व्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुथेच्छा!!
“कौन कहता हें
आसमां में छेद
नहीं होता हे
एक पत्थरतो
तबीयतसे
उछालो यांरो …”
लेखन व शब्दांकन: ज्येष्ठ संपादक धनंजय कळमकर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here