‘संपूर्ण कर्ज माफी आणि वीज बिलमुक्ती’सह इतर मागण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक, आज होणार राज्यव्यापी ऊस परिषद…

उपसंपादक: संतोष तावरे.
आज दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता शेतकरी संघटनेचे नेते मा.रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव ढमढेरे येथे भव्य ऊस परिषद आयोजित केली असून,या ऊस परिषदेसाठी राज्यभरातून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात येणार असून, आपणही ऊस परिषदेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या मधायमातून पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केले. या ऊस परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ शिवाजीराव नांदखिले, रामेश्वर गाडे, अजित दादा काळे, पांडुरंग रायते, हनुमंत वीर, कालिदासजी आपेट, बाळासाहेब घाडगे, बाबा हारगुडे, वर्षाताई काळे, वस्ताद दौंडकर व तालुकास्तरावरील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत .शेतकरी मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस साखर कारखान्यांना घालतो मात्र या साखर कारखान्यावर 25 घराण्यांची मक्तेदारी असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळायला तयार नसल्याचा आरोप रायते यांनी केला आहे. मागील आठ दहा दिवसांपूर्वीच या ऊस परिषदेसाठी प्रत्येक गावोगावी जाऊन,शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन इंदापूर तालुक्याचे शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ता सचिन कोथमिरे आणि त्यांच्या शेतकरी संघटनेमधील सर्व कार्यकर्त्यांनी जनजागृती करून ऊस परिषदेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.ऊस परिषदेतील प्रमुख मागण्या अशा आहेत.१) संपूर्ण कर्ज व वीज बिल मुक्ती झालीच पाहिजे २ ) दोन साखर, इथेनॉल कारखान्यातील हवाई अंतराची आट रद्द झालीच पाहिजे ३) कांदा बटाटा वरील निर्यात बंदी कायमची बंद झालीच पाहिजे ४) गुंठेवारीची नोंद तात्काळ चालू करून तुकडेबंदी कायदा रद्द झाला पाहिजे ५) सातबारा वरील पुनर्वसंचे शिक्के तात्काळ रद्द झाले पाहिजे, अशा बऱ्याच मागण्या ऊस परिषदेत मांडण्यात येणार आहेत. “तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करू नका”, शेतकऱ्यांनो घराच्या बाहेर पडा, संघटित व्हा, तरच आपण टिकणार आहोत सर्वांनी ऊस परिषदेसाठी जरूर या अशा शब्दात इंदापूर तालुक्याचे शेतकरी संघटना युवा नेते सचिन कोथमिरे, तालुका अध्यक्ष हरिदास पवार ,तालुका उपाध्यक्ष तुकाराम निंबाळकर,मंगेश घाडगे यांनी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन कळकळीने शेतकऱ्यांना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here