खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना रेल्वे लाईन भुयारी मार्ग मंजूर होण्यासाठी राजाभाऊ कदम यांनी दिले निवेदन

करमाळा प्रतिनिधी: आज खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर करमाळा दौऱ्यावर आले असता खासदार यांची भेट घेऊन उमरड केडगाव येथील ग्रामस्थांनी राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली खासदार यांची भेट घेऊन मुंबई बेंगलोर रेल्वे मार्ग खालून केडगाव उमरड रस्त्यासाठी भुयारी मार्ग व्हावा म्हणून खासदार यांना केडगाव येथील विनोद चव्हाण, उमरड येथील माजी सरपंच संदीप मारकड पाटील, भाग्यवंत बंडगर, सागर मारकड, आधी कार्यकर्त्यांनी खासदार यांची भेट घेतली व रेल्वे लाईन खालून केडगाव उमरड भुयारी मार्ग झाल्यास चिकलठाण नंबर एक नंबर दोन कुगाव केडगाव उमरड सोगाव अंजनडोह वीट या मार्गाने करमाळ्याला जाण्यासाठीचे अंतर जवळचे पडत असल्याने या भागातील समस्त नागरिकांची मागणी आहे ही गोष्ट खासदार यांच्या लक्षात आणून दिली साधारण 30 ते 40 गावातील लोकांचा प्रश्न सुटणार आहे त्यामुळे खासदार साहेबांनी भुयारी मार्ग करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे अशी विनंती बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी यांनी केली या मागणीला तत्काळ समर्थन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिले खासदार साहेबांनी भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी माझ्या स्तरावरती निश्चित प्रयत्न करेल आसे आश्वासन दिले यावेळी उपस्थित तहसीलदार समीर माने साहेब पोलीस निरीक्षक गुंजवटे साहेब व उमरड चे माजी सरपंच संदीप मारकड पाटील, केडगाव येथील विनोद चव्हाण, डॉक्टर बंडगर सागर मारकड आधी लोक उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here