उपसंपादक: निलकंठ भोंग
👉 एकमेकांना पेढा भरवत निमगावकरांनी केला आनंदोत्सव साजरा
निमगाव केतकी म्हटलं की दुष्काळ हे समीकरण गेले अनेक वर्षापासून तालुका भर किंबहुना जिल्हाभर माहिती आहे. निमगाव केतकीला सोयरीक जुळवायची म्हटलं तरी पाहुणे मंडळी विचार करतात. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दोन दोन किलोमीटर चालत जाण्याची वेळ येत असते. परंतु महिलांच्या डोक्यावरील हंडा हा कायमचा उतरवण्याचा ध्यास महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलनायक आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतला आहे. निमगाव केतकी गावासाठी हर घर जल योजनेसाठी त्यांनी सत्ता नसताना ही तब्बल ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
निमगाव केतकी येथे हर घर जल योजनेसाठी ९० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे कळताच निमगाव केतकी येथील नागरिकांनी एकमेकांना पेढा भरवुन हा आनंदोत्सव साजरा केला. दत्तात्रय भरणे यांचे समस्त निमगावकरांच्या वतीने आभार मानले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे, कुलदीप हेगडे, अमोल राऊत, महेश जठार, महादेव पाटील, सुनील भोंग, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे मामा यांनी हर घर जल योजनेच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावचा हंडा कायमचा उतरवला असून यापूर्वी निमगाव केतकीच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी दिलेला आहे. त्यामुळे निमगावकर कधीच मामांना विसरणार नाहीत.
-तात्यासाहेब वडापुरे
ग्रामपंचायत सदस्य निमगाव केतकी