महिला बचत गटांना लघु उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देणार- आमदार राजेश पाटील.

वैभव पाटील :पालघर जिल्हा प्रतिनिधी 📲 9850868663
👉 खामलोली (बायांचापाडा) येथील समाज मंदिराचे आमदारांच्या हस्ते उद्घाटन.
बोईसर विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार मा. राजेशजी पाटील यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मौजे खामलोली (बायांचापाडा) येथे आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन सोमवार दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी आमदार राजेश पाटील यांचा ग्रामस्थांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गावचे सुपुत्र सू. क्ष.ज्ञातीहितवर्धक मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संतोष पावडे यांचा सत्कार करण्यात आला.समाज मंदिरासाठी निधी मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अजय भास्कर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.यावेळी आमदार राजेश पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थ,महिला, व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ह्या वास्तूची जतन करण्याचे व पावित्र्य राखण्याचे आवाहन केले. आजची ही लहान मुले उद्याचीसंपत्ती आहे.शिवाय महिला बचत गटांना लघु उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.सर्वांना गणपतीच्या व गौरीच्या सणाच्या शुभेच्छा दिल्या,येणाऱ्या काळात गावाच्या विकासासाठी आपण सर्व एकत्र काम करू मी तुमचा लोक प्रतिनिधी असलो तरी तो अधिकार आपण मला आमदार बनवून तुम्ही दिला आहे .तुम्ही सर्व माझे हात आहात ,अशीच साथ शेवटपर्यंत द्या. अशी भावनिक हाक उपस्थिताना दिली. परिसरातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here