👉 आमदार दत्तात्रय भरणे यांना गावचे सरपंच यांनी शाळा दुरुस्ती बाबत दिला होता शब्द …
मुख्य कार्यकारी संपादक: गणेश घाडगे
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वर्ग खोल्या गळण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे काही शाळांना वर्ग खोल्यांची अडचण आहे. तर काही शाळांत वर्ग खोल्या असूनही गळत आहेत. त्यातीलच एक शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवस्ती निमगांव केतकी. भोसले वस्ती शाळेत १७० ते १९० विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या नाहीत यासाठी वारंवार पालकांनी निवेदन करून गटशिक्षणाधिकारी तसेच सरपंच यांना पाठपुरावा देखील केलेला आहे.
गेल्या वीस पंचवीस दिवसापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालकांच्या आग्रहा खातर या शाळेला भेट दिली. आणि या शाळेसंबंधी सर्व अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात त्यांनी मंजूर झालेल्या वर्ग खोली संदर्भात अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलणे देखील केले आणि सात दिवसात वर्गखोली चालू करण्याचे आश्वासन ही दिले. परंतु पालकांनी सद्यस्थितीला शाळा गळत असल्याचे लक्षात आणून देताच सदर वर्ग खोल्यांवरती तात्पुरता प्लास्टिक कागद निमगाव केतकीचे सरपंच यांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून टाकण्याचे सांगितले. त्यास सरपंचांनी दोन दिवसात टाकतो असे सांगून होकार दिला.मात्र आज तागायत या शाळेचे वर्गखोलीचे काम चालू झाले ना शाळेवरती कागद पडला.त्यामुळे “सरकारी काम आणि थोडे दिवस थांब”याची प्रचिती येथील पालकांना आली.तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला दिलेला शब्द जर सरपंच पाळू शकत नसतील तर त्यांच्याकडून गावच्या विकासाची काय अपेक्षा करायची. असे मत यावेळी पालकांनी व्यक्त केले. पालकांमध्ये चर्चा सुरू झाली की तालुक्याच्या आमदारांच्या शब्दाला निमगाव केतकी मध्ये काडी मात्र किंमत नाही.