स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित साधून भांडगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन नागरिकांचाही शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

भांडगाव: आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित साधून आज भांडगाव मध्ये भांडगाव ग्रामपंचायत व मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .या शिबिरास उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सहभाग घेतला, जवळपास 50 नागरिकांनी आपले रक्तदान केले ,यावेळी भांडगाव ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच ,ज्येष्ठ नागरिक ,तरुण वर्ग यांनी हजेरी लावली. खरंच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे लक्षात घेऊन भांडगाव ग्रामपंचायत ने हा उपक्रम राबवला त्यामुळे भांडगाव ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे .भांडगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष गायकवाड (सर )यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले की, खरंच रक्तदान हे सर्वांनी केलेच पाहिजे कारण आपण रक्तदान करतो म्हणजे आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतोच, कधी कोणाला रक्ताची गरज भासेल काही सांगता येत नाही, उद्या आपल्याच घरातील कोण आजारी असेल आणि त्याला तातडीने रक्ताची गरज लागत असेल तर अर्जंट आपल्यालाही रक्त मिळणे कठीण जाते, खूप धावपळ करून सुद्धा रक्त मिळणे कठीण जाते. त्यामुळे एकमेकांना सहाय्य करण्यासाठी एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी आपण रक्तदान हे केले पाहिजे .यापेक्षा मोठे कोणतेच दान नाही हेच श्रेष्ठ दान आहे, असे सुभाष गायकवाड सर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here