प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच नियोजन अभावी नागरिकांना पाणी असताना देखील पाण्याची भटकंती करावी लागत आहे.स्व.आ.भालके यांनी ही योजना आणली त्यासाठी तब्बल 71 कोटी रुपयांचा निधी ही प्राप्त झाला.मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही योजना मोडकळीस आलेली दिसून येत आहे.
या योजनेअंतर्गत तब्बल 39 गाव येतात या 39 गावातील नागरिकांना या पाण्याचा लाभ मिळणार आहे सदर योजनेविषयी माहिती घेतली असता ज्या ग्रामपंचायतने या योजनेतून पाणी घेतले आहे त्यांनी पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे परंतु त्या ग्रामपंचायती पाणीपट्टी भरायला तयार नाही असे ऐकण्यास मिळाले त्यामुळे या योजनेला घरघर लागली आहे.सदर ची योजना कशा पद्धतीने सुरू करता येईल याचा प्रशासनाने तात्काळ विचार करून ही योजना सुरू करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखाली प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी चेतन वाघमोडे यांनी दिला.