सावकारांना जिल्हा उपनिबंधकांचा जबर झटका. पंचवीस वर्षांपूर्वी सावकारीतून बळकवलेली उजनी जवळची सहा एकर जमीन परत मिळणार.सविस्तर वृत्त असे की,सावकारीतून मिळवलेली ९ एकर १४ गुंठे शेत जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कर्तव्यदक्ष अधिकारी कुंदन भोळे यांनी दिले आहेत, त्यामुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. ही सर्व जमीन उजनी धरणालगतची असून करमाळा तालुक्यातील सावकारीचा दहा प्रकरणाच्या निकालात एकाच कुटुंबातील तब्बल सात जण आहेत. पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील ज्योती पोपट मासाळ यांची ६० आर, कुगाव येथील किसन बापू हवालदार ६२आर, चिकलठाण नंबर दोन येथील अभिमन्यू भिवा सरडे २५ आर , पत्नी सुशीला अभिमन्यू सरडे २५ आर, जगन्नाथ गोविंद बोंद्रे ४० आर, संतोष रामा गलांडे यांची २१ व ८१आर, बबन रामा गलांडे यांची ८१ आर, जेऊर येथील राजकुमार छगनलाल गादिया ९५ चौरस ७ मीटर, करंजे येथील शांताबाई रामकिसन पाटील ४० आर, अण्णासाहेब उर्फ मारुती रामकिसन पाटील ४० आर, जमीन सावकारांच्या तावडीतून सुटली आहे.