कुर्डूवाडीचा सुपुत्र कृष्णा सातपुते होणार आता भारतीय टेनिस क्रिकेट संघाचा कर्णधार, पाकिस्तानने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी होणार रवाना.

👉 पाकिस्तानने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भारताकडून करणार प्रतिनिधित्व.
कुर्डुवाडी: नसीर बागवान
कुर्डुवाडीचा सुपुत्र कृष्णा सातपुते याची दुबई मध्ये होणाऱ्या सहा देशाच्या लिग प्रकारे खेळवण्यात येणाऱ्या सुपर फिक्स चॅम्पियन ट्रॉफी दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी कृष्णा सातपुते यांची निवड करण्यात आली.कृष्णा सातपुते यांच्या नावावर आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे 23 शतके आहेत.तो उजव्या हाताचा फलंदाज असून आक्रमक फलंदाजी करण्यासाठी तो भारतात ओळखला जातो.या स्पर्धेत भारत, पाकिस्तान,श्रीलंका, यूएई ,ओमान, कॅनडा, हे सहा संघ भाग घेणार आहेत. त्याच्यावर दुबई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.ही स्पर्धा टेनिस बॉल प्रमाणे टेप बॉल वर खेळवली जाते.कृष्णा सातपुते यांनी अनेक वेळा दुबई येथे जाऊन दुबई येथील स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे .त्याचा दुबईतील खेळ पाहून पाकिस्तान फिक्स स्पर्धेसाठी कृष्णा सातपुतेची आघाडीचा फलंदाज व कर्णधारपदी निवड केली गेली आहे.स्पर्धेत भारत, पाकिस्तान हे संघ बलाढ्य असल्यामुळे अंतिम सामना हा भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे.कृष्णा सातपुते यांना जनता एक्सप्रेस मराठी न्यूज कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here