साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंतीचे नियोजन अवसरी गावातील लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान अवसरी यांनी केले असून जयंतीची तयारी ही जोरदार झाली आहे. अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई सुप्रिया मंडप अवसरी यांनी केली असून ही विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आणि या जयंती साठी SRS.RD हा पुणे जिल्ह्यात नावाजलेला डीजे तरुण युवकांनी मिरवणुकीसाठी लावला असून त्यामुळे सर्व तरुणाई मध्ये जोश निर्माण झाला आहे .डीजेच्या गाण्यावर तरुणांचा जलवा पाहावयास मिळणार आहे. या जयंती साठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना. श्री. दत्तात्रेय भरणे व श्री. हर्षवर्धनजी पाटील उपस्थित राहणार आहेत. उद्या होणाऱ्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले असून यामध्ये उद्या दि.१७/८/२०२२ रोजी सकाळी अकरा वाजता गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी बारा वाजता वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे .सायंकाळी पाच वाजता प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होईल व सहा वाजता साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची मिरवणूक चालू होईल, मिरवणूक झाल्यानंतर स्नेहभोजन होणार आहेत असे या जयंतीच्या कार्यक्रमाचे स्वरूप असेल अशी माहिती जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शी बोलताना लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान अवसरी मधील नवयुवक तरुण मित्र मंडळींनी दिली असून अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील सर्व लोकांनी जयंतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान अवसरी यांनी केले आहे. दहा दिवस झाले सगळी तरुणाई एकत्र येऊन जयंतीची तयारी जोरदारपणे केल्याचे दिसत आहे. लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे युवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते विजय कांबळे, नितीन कांबळे, पांडुरंग कांबळे (ग्रामपंचायत सदस्य), नंदकुमार कांबळे, सोमनाथ शिंदे, संतोष कांबळे ,नवनाथ कांबळे, राहुल पवार ,किशोर कांबळे, सुनील पवार ,अमोल कांबळे ,रोहित कांबळे ,सोमनाथ कांबळे, तन्मय भिसे, माऊली नाईकनवरे ,सचिन कांबळे या तरुण युवकांनी जयंतीचे सुंदर असे नियोजन केले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मार्फत यांनी केले आहे.