संपूर्ण देशभरात स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या मध्ये सहभाग नोंदवत भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी च्या वतिने मौजे लासुर्णे तालूका इंदापूर येथे स्तंभ उभारून सार्वजनिक स्वरूपात ध्वज फडकवला.या कार्यक्राचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ध्वजारोहण हे एका सैनिकाच्या पत्नीच्या हस्ते करण्यात आले,लासुर्णे गावचे सुपुत्र सैन्य दलात देशसेवा करत असलेले सामान्य कुटुंबातील “शिपाई/जीडी- सचिन बनसोडे ,121 वी बटालियन ” कार्यरत असलेले गाव हिरानगर,ता-कठुआ, राज्य – जम्मू-कश्मीर यांच्या पत्नी सौ करिष्मा बनसोडे यांच्या यांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.या ध्वजारोहणा नंतर वालचंदनगर नगर पोलीस चौकीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मा.बिराप्पा लातुरे व किसान मोर्चा प्रदेश सदस्य माउली चवरे यांच्या हस्ते सौ बनसोडे यांचा साडी,शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी आयोजक गजानन वाकसे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी अभिषेक ताटे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.शुभांगी सोनवणे,विज वितरण कंपनी चे प्रकाशन खरात,रयत शिक्षण संस्थेचे आय.बी आवळे,ए.एन साबळे,पि.ए मारकड सर या सह ,रणजित पांढरे, नेताजी लोंढे,पांडुरंग सुळ, अंबादास गायकवाड, राजकुमार करे,सुरज रासकर,सिध्दी जगताप,देविदास बोराटे उपस्थित होते.प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा हा पंतप्रधान मोदीजींचा संदेश ग्रामीण भागात पोचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांच्या वतीने हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी इंदापूर तालुक्यात लासुर्णे परिसरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लासुर्णे येथे दिप प्रज्वलन करत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.त्या प्रसंगी उपस्थित स्थानिक मान्यवर 💐💐🙏