कळंब गावचे सुपुत्र चि.किरण मगर यांची विवो प्रो कबड्डी सिजन ९ मध्ये यु मुंबा संघात ३१ लाख रुपयांची बोली लागून निवड झाल्याबद्दल राणाप्रताप क्रिडा मंडळ कळंब व पै.संदिप पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी मा.राज्यमंत्री विकासरत्न आमदार श्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते चि.किरण मगर यांचा शाल, फेटा व श्रीफळ देऊन सत्कार समारंभ संपन्न झाला.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदरणीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी कळंब गावाला कबड्डीची पहिल्यापासून परंपरा असल्याचे सांगून १९७७ पासून आदरणीय कै.गुलाबराव नाना यांच्यापासून चालत असलेली कबड्डीची परंपरा पुढे श्री मधुकरबापु पाटील यांनी कबड्डीमध्ये चांगला खेळ दाखवून राज्य, देशपातळीवर विविध पुरस्कार कळंबसाठी आणले व तीच परंपरा पुढे चालवत चि.किरण मगर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही प्रत्येक संकटावर मात करून आपल्या खेळाशी प्रमाणिकपणे राहून प्रचंड मेहनत घेतल्यानेच त्याला आजचे कबड्डीमधिल उत्तुंग यश प्राप्त करता आले.त्याच्या प्रो कबड्डी संघातील निवडीने कळंबसह इंदापूर तालूक्याचे नाव देशपातळीवर गेले याचे इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला गर्व असून याचा मला व माझ्या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला निश्चितच अभिमान आहे.यापुढील काळात किरणला खेळाच्या दृष्टीने ज्या काही बाबींची गरज असेल त्यासाठी मी इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या सदैव खंबीरपणे पाठीशी उभा रहाणार असल्याची जाहीर ग्वाही आदरणीय श्री दत्तात्रय मामा भरणे यांनी उपस्थितांना दिली.या कार्यक्रमाच्या प्रसंगी कळंब परिसरातील जेष्ठ नेते श्री मधुकर बापु पाटील,रेडणी गावचे श्री सुभाष पाटील,मा.पंचायत समिती सदस्य श्री सुहासदादा डोंबाळे पाटील,ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रामचंद्र कदम,कळंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मा.चेअरमन श्री आप्पासाहेब अर्जून, विद्यमान चेअरमन श्री अभिजित खंडागळे,कळंब ग्रामपंचायतीचे सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत,चिखलिचे मा.सरपंच श्री शिवाजी अर्जून,घोरपडवाडी गावचे जेष्ठ नेते श्री गजानन लंबाते,कळंब परिसरातील जेष्ठ मार्गदर्शक श्री सुधिर डोंबाळे सर, श्री संदिपान चितारे,श्री सोमनाथ घोडके,श्री रमेश कोळी,श्री हनुमंत राऊत,श्री परमेश्वर अर्जून, श्री गोविंद डोंबाळे,श्री गिरीधर खोमणे, दत्तात्रय कोळी,श्री राजेंद्र कोळी,जिलानीभाई शेख,खोरोची गावचे मा.सरपंच श्री संजय चव्हाण,निमसाखर ग्रामपंचायत सदस्य श्री दिपक लवटे,कळंब ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर मेटकरी, श्री राजेंद्र डोंबाळे, श्री संदिप पाटील, श्री प्रमोद खंडागळे, श्री सागर कोळी,श्री गणेश चव्हाण,श्री विजय राऊत, श्री राहुल अर्जून,श्री तानाजी कदम,श्री राजू धारे, संजय कांबळे, श्री दादासो घाडगे,श्री पांडुरंग घाडगे,श्री दादासाहेब डोंबाळे, श्री नितिन जानकर,श्री महेश धायगुडे, रणजित राऊत,सागर राऊत, स्वप्निल मडके,प्रणव पारसे,प्रितम मोहिते,आकाश डोंबाळे, दत्तात्रय चितारे,संदिप डोंबाळे,अशिष डोंबाळे,रवि मगर, प्रतिक कोंडलकर,सचिन गुटाळ,विजय कदम, ऋषिकेश राऊत, रोहित मोहिते, मुकेश शिंदे,धिरज कदम, समाधान गुटाळ, महेश बामणे, महेश बेलपत्रे,दिपक खरात यांच्यासह कळंब ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.