उद्या होणार मंगळवेढा तालुक्यात बोंबाबोंब आंदोलन.. प्रहार जनशक्ती पक्षाने दिला होता इशारा.. मंगळवेढा तालुक्यातील महत्त्वाची बातमी वाचा सविस्तर.

मंगळवेढा तालुक्यात सध्या प्रहार जनशक्ती पक्षाने वेगवेगळे विषय हाती घेत अनेक समस्या शासन दरबारी पोहोच करण्याचे काम सध्या जोमात चालू आहे. नुकताच शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने विक्रेत्यांना धारेवर धरण्याचे काम सध्या प्रहारने हाती घेतलेले असून यापूर्वी सुद्धा अनेक विषयांना वाचा फोडण्याचे काम हे मंगळवेढा तालुक्यातून एकमेव प्रहार जनशक्ती पक्ष करताना दिसत आहे. गेल्या आठवड्यामध्येच याच पक्षाने शासनाला एक अल्टिमेटम दिला होता यामध्ये आपण देशाला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करत असतानाच दुसऱ्या बाजूला आजही ग्रामीण भागातील लोकांपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचत नाहीत त्याचप्रमाणे पाणी वीज तसेच आरोग्य सुविधा ह्या सुद्धा त्यांना व्यवस्थित रित्या मिळत नाहीत शासनाच्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत आणि त्यामुळे नागरिकांना योग्य सेवा मिळत नाही या सर्व कारणांबरोबरच ग्रामीण भागातील लोकांना आपण कोण-कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे माहीत नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या बाहेर नोटीस लावून या सर्व योजनांची माहिती त्यांना डिजिटल फलकाद्वारे देण्यात यावी या मागणीसाठी अल्टिमेटम देण्यात आला होता.
प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या अल्टिमेटमध्ये 11 तारखेपर्यंत या सर्व गोष्टींची पूर्तता न झाल्यास शुक्रवार दिनांक 12 रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब करणार असा इशारा दिला होता याच इशाराच्या अनुषंगाने उद्या पक्षाच्यावतीने सामूहिक बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे असे प्रहारचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी माहिती दिली.
या आंदोलनात प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष संतोष पवार जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजू सावंत जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील,जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या सह तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी,शहर अध्यक्ष सचिन साळुंके,कार्याध्यक्ष अमोग सिद्ध काकणकि, संपर्क प्रमुख सिद्धेश्वर पाटील, तानाजी माने, बापूसाहेब घोडके, उपाध्यक्ष चेतन वाघमोडे,दत्ता पाटील,बापू मरीआई वाले,विलास सलगर, विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर,विभाग प्रमुख सारिका कवचाळे ,विभाग संपर्क प्रमुख महेश तळऴे,फैयाज मुलानी, अमोगसिद्ध् पाटील, हमीद इनामदार, बंडू कोळी, आप्पाराया काकनकी,सिद्धाप्पा काकनकी,मल्लु तळ्ळे, शशी कोळी,नागनाथ म्हमाणे,दत्ता कोरे,संतोष परीट,अक्षय मोहिते,आप्पा आसबे,लक्ष्मण बिराजदार,दादा वाघमोडे,बिरू पांढरे, समर्थ आसबे, तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होणार आहेत. आता या आंदोलनानंतर शासनाची काय भूमिका असेल आणि या ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब व्यक्तींना भविष्यात काय याचा फायदा होतोय यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here