मंगळवेढा तालुक्यातील खत दुकानदार शेतकऱ्यांना युरिया देत नाहीत व युरिया घ्या पण त्यासोबत लिंक म्हणजेच छोटं पिल्लु घ्या तरच युरिया मिळेल अशी वागणूक दुकानदार शेतकऱ्यांना देत आहेत. या प्रकारच्या तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाकडे आल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारी मांडल्या.त्यांच्यावर कारवाई करा अशा सूचना केल्या. खत दुकानांमध्ये खताचा स्टॉक किती आहे खताचा दर किती आहे असा बोर्ड दुकानाबाहेर लावणे बंधनकारक असताना अनेक दुकानदाराच्या दुकानाबाहेर बोर्ड नाहीत अशाही दुकानदारावर कारवाई करावी. अनेक दुकानदार शेतकऱ्यांना खत घेतल्यानंतर ओरिजनल पावती न देता कच्ची बिले तयार करून देतात. अशाही दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेकडून करण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी लवकरच त्यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले आहे. यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष संतोष पवार,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजू सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन गरंडे,कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकणकी संपर्क प्रमुख तानाजी माने, बापू घोडके , सिद्धेश्वर पाटील,उपाध्यक्ष चेतन वाघमोडे, दत्ता पाटील,विलास सरगर विभाग प्रमुख नवनाथ शिरसटकर , सारिका कवचाळे, संपर्क प्रमुख महेश तळऴे, आप्पाराया काकणकी मल्लू तळे प्रज्वल मलकारी, सुभाष सलगर,राजू नागणे,तुळशीराम सोनवणे,विलास आकळे,लक्ष्मण बिराजदार,रवी बिराजदार,किरण नागणे, सिद्धाप्पा काकणकी बिळेनीसिध्द पाटील, रामगोंडा ह्वनुटगी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..