👉हरिनाम सप्ताहाची बिरोबा मंदिरात सांगता
इंदापूर(प्रतिनिधी):युवक युवतीने व प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी,आपल्या आई- वडिलांना देव मानून,त्यांच्या असणाऱ्या आपल्याबद्दल इच्छा आकांक्षा पूर्ण करा,कोठेही देव दर्शनाला जाण्याची गरज नाही.आई-वडिलांची सेवा केल्यानंतर काही कमी पडत नाही.माता पित्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे आवाहन माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील ग्रामदैवत बिरोबा देवस्थान येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.(बुधवार ता.१०) रोजी काल्याच्या कीर्तनाने व काल्याची मानाची दहीहंडी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते फोडत,हरी किर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.यावेळी बिरोबा भक्त निवास कार्यालयाचे उद्घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार भरणे बोलत होते.
यावेळी सारिकाताई भरणे,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशालीताई पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,युवक नेते नवनाथ रुपनवर,भरणेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच आबासाहेब भरणे,कांतीलाल भरणे, स्वातीताई भरणे,उपसरपंच विजयाताई मस्के, प्रतापराव चवरे,यांच्यासह नागरिक व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की,प्रत्येकाने जर आपल्या आजी-आजोबांचा विचार केला तर,त्यांना किती थोड्या अपेक्षा असतात हे कळेल.मात्र प्रत्येक कुटुंबामध्ये जुन्या पिढीने जे संस्कार दिले आहेत ते संस्कार संस्कृती नव्या पिढीने जपले तर,जे पेरलं आहे ते नक्की उगवते, व ते कुटुंब आदर्श ठरते तो परिसर तो भाग आनंद घेतो आणि देतो.मी पुणे जिल्हा बँकेला संचालक झालो होतो त्यावेळेस बाबीर देवस्थानच्या दर्शनाला आल्यानंतर येथील भक्तगणांनी,सभा मंडप उभारावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.बिरोबा देवस्थान जागरूक असल्यामुळे,एक-दोन दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर मला जाण्याचा योग आला. त्यावेळेस सभा मंडपाची मी मागणी केली, लगेचच या सभा मंडपासाठी निधी उपलब्ध पवार साहेबांनी करून दिला.त्यामुळे आज भक्तगणांना सुविधा मिळत आहेत.अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल.बिरोबा देवस्थानच्या भक्त जणांसाठी भक्तनिवास कार्यालय अद्यावत निर्माण केले आहे.मात्र येथील स्वच्छता आपले घर मानून परिसरातील भाविकांनी नागरिकांनी करावी, याचा आनंद बिरोबा देवस्थाना नक्की असेल, आगामी काळात या परिसरात अनेक सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.अशीही ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.