इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत काल दिनांक ८ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम शालेय विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक क्रांतीज्योत प्रज्वलित करून ती देशभक्तीपर गाण्यावर मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली . “भारत माता की जय, वंदे मातरम” या जयघोषाने वातावरण पल्लवीत झाले होते. या कार्यक्रमांमध्ये क्रांतीज्योत आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.क्रांतिकारकांच्या वेशभूषेत असलेले विद्यार्थी यांनी अवघ्या इंदापूरकरांची मने जिंकण्यासाठी यशस्वी झाले होते .. कोणी बनले भगतसिंग, कोणी बनले राजगुरू, कोणी बनले महात्मा गांधी,तर कोणी बनले मंगल पांडे ही सर्व वेशभूषा इंदापूरकरांना प्रामुख्याने आकर्षित करत होती. एकूणच या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून क्रांतिकारक सुखदेव, लोकमान्य टिळक ,उमाजी नाईक ,महात्मा गांधी , स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद ,भगतसिंग,नानासाहेब पेशवे,लहुजी साळवे,मंगल पांडे,बिरसा मुंडा,राजगुरू,शिरीष कुमार,कित्तुस्वी राणी, झलकारी बाई , झाशीची राणी , सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत अनुक्रमे रोहित राऊत ,सार्थक नाळे, शाहिद शेख, सुजित चोरमले, मानव काळे ,शिवराज निंबाळकर,अथर्व चव्हाण, रुद्र नलवडे, शिवम पवार ,जुनेद कुरेशी, मोईन बागवान ,यज्ञेश ढवळे, यश कोळेकर, श्रीजा घाडगे ,आरोही ढावरे ,अक्षरा बनकर ,भावेश परबतेआणि अर्पित शिंदे यांनी वेशभूषा साकारली .विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतील क्रांतिकारकांचा परिचय प्रशालेच्या सहशिक्षिक संतोषी बनकर यांनी विद्यार्थ्यांना करून दिला तर इयत्ता चौथी मधील दिग्विजय गलांडे या विद्यार्थ्यांने आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.