वैद्यकीय क्षेत्रात 100% नोकरीची हमी देणारे ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज सुरू..,इंदापूर तालुक्यातील बेरोजगार मुला-मुलींकरिता सुवर्णसंधी.  

इंदापूर: ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर या कॉलेजचे काल उद्घाटन झाले असून इंदापूर तालुक्यातील बेरोजगार लोकांसाठी ही एक रोजगाराची सुवर्णसंधी असणार आहे.या संस्थेमार्फत बेरोजगार लोकांना 100% शासकीय , निमशासकीय परदेशात महानगरपालिकेमध्ये, नगरपालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय इत्यादी ठिकाणी नोकरीची संधी मिळू शकते.काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष समाज भूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आजबे जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकळ यांच्या हस्ते अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक सागर जाधव यांनी दहावी आणि बारावीनंतरच्या मुला मुलींनी व्यवसायिक शिक्षणअंतर्गत युवकांना रोजगार संधी असुन विद्यार्थांनी करिअर क्षेत्रात पाऊल टाकावे असे युवापिढीला आवाहन करून प्रमुख पाहुणे, मान्यवरांचे स्वागत केले. उद्घाटन समारंभाप्रसंगी जिजाऊ इन्स्टिट्युटच्या प्राचार्या राजश्री जगताप, प्रा.सागर उंबरे , मराठा सेवा संघाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे, तालुकाध्यक्ष शिवश्री महेश कोरटकर, शहराध्यक्ष शिवश्री राहुल गुंडेकर, शिवश्री प्रतिक झोळ, शिवश्री ॲड. सचिन चौधरी, संभाजी ब्रिगेडचे श्रीनिवास शेळके, तसेच इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिकेत वाघ उपस्थित होते.या

संस्थेमध्ये अनुभवी तज्ञ शिक्षकांचे वैयक्तिक मार्गदर्शक असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे.ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साठी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची सोय करून बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना राहण्याची व मेसची सोय केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीस्कर असे झाले आहे.सध्या येथे प्रवेश चालू झाला असून बेरोजगार मुला मुलींसाठी वैद्यकीय क्षेत्रात 100 टक्के नोकरीची हमी या संस्थेमार्फत देण्यात आली असून इच्छुकांनी त्वरित या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.डिप्लोमा इन मेडिकल लायबोरिटरी टेक्नॉलॉजी(DMLT), डायलिसिस टेक्नॉलॉजी अँड नर्सिंग मॅनेजमेंट,आय.सी.यू .टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन,कार्डियाक केअर टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन अशा प्रकारचे 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस चालू झाले असून यामध्ये बारावी पास झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे.त्याचप्रमाणे H.A असिस्टंट साठी दहावी पास /नापास विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्सेस प्रवेश प्रक्रिया सुद्धा चालू आहे.इंदापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी चालू झाले असून यामध्ये गरजूंनी सहभाग घेऊन आपले भवितव्य उज्वल करावे असे या संस्थेच्या व्यवस्थापकांकडून आवाहन करण्यात आले आहे.प्रवेश प्रक्रिया व इतर माहितीसाठी संपर्क क्रमांक 8329042838 ,9370289055 ,9172872889 , 9519030842.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here