माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डाळज सोसायटी व हनुमान सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉईस चेअरमन व संचालक यांचा केला सत्कार.

इंदापूर प्रतिनिधी:डाळज कार्यकारी सेवा सोसायटी व हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी डाळज या दोन्ही संस्थांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. सदर निवडणूक डी एन काका जगताप व डाळज नंबर १,२,३ चे विद्यमान सरपंच विकास (आप्पा )कुंभार व दादासो गलांडे सतीश हगारे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली असून सदर निवडणुकीमध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला असून डाळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पदी रामदास जगताप व व्हॉईस चेअरमन पदी सुमन वाकळे यांची बिनविरोध निवड झाली तर हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र गलांडे व्हॉईस चेअरमन पदी दत्तात्रय पवार यांची यांची बिनविरोध निवड झाली व सर्व संचालक मंडळाने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.त्यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित सर्व नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालक यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढील कारभार चालवू असे म्हटले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here