विशेष प्रतिनिधी: महेश सूर्यवंशी
खानवटे( ता.दौंड ): रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण करून गावामध्ये खेळीमेळीचे वातावरण तयार करण्याच्या हेतूने या ‘स्वतंत्रता अमृत महोत्सव 2022’ निमित्त खानवटे ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ. नंदिनी भिकचंद शिरसाट यांनी रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकू, आणि विशेष कार्यक्रम,कॉमेडी तडका होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा खास महिलांसाठी आयोजित केलेल्या आहे.
रविवारी दि.7 ऑगस्ट 2022 बा .व्ही .माध्यमिक विद्यालय खानवटेच्या शालेय प्रंगणामध्ये दुपारी 12 ते 2 वाजता रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.त्यानंतर दुपारी 3 ते 6 वाजता हळदी कुंकवाचा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे व सायंकाळी 6 वाजता मुख्य कार्यक्रम कॉमेडी तडका होम मिनिस्टर पैठणीचा आयोजित करण्यात आलेला आहे.अतिशय भव्य अशा या कार्यक्रमाची बक्षिसे रांगोळी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस स्मार्टफोन तर दुसरे बक्षीस इडली कुकर, तिसरे बक्षीस प्रेशर कुकर, चौथे बक्षीस इलेक्ट्रॉनिक इस्त्री तसेच,पाचवे बक्षीस किचन डिश सेट अशी ठेवण्यात आलेले आहेत व संध्याकाळी होणाऱ्या होम मिनिस्टर स्पर्धेची बक्षिसे फ्रिज व मानाची पैठणी घरगुती गिरण एअर कुलर ओवन मिक्सर असे ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये खास लकी ड्रॉ म्हणून दोन स्मार्ट वॉच ,दोन टेबल फॅन, दोन डिनर सेट, दोन जुसर, दोन फ्राय पॅन तर पाच साड्या असे प्रकारे ठेवण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
या कॉमेडी तडका होम मिनिस्टर पैठणीचा कार्यक्रमाचे सादर करते अभिनेते सुभाष यादव हे आहेत.बक्षीस वितरण कांचनताई राहुल कुल यांच्या हस्ते होणार आहे तर तालुक्यातील अनेक सरपंच व सदस्य कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. महिला सरपंच सौ.नंदिनी भिकचंद शिरसट यांनी स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची तालुक्यात चर्चा व कौतुक होत आहे.दौंडचे कार्यक्षम आमदार राहुल दादा कुल यांनी याबद्दल सरपंच नंदिनी शिरसाट यांचेेेे विशेष कौतुक केले.
Home ताज्या-घडामोडी खानवटे ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांचा अनोखा उपक्रम,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त खानवटे येथे ...