पाटस येथील मोटेवाडा या ठिकाणी बाबीर देवाच्या सभामंडपाचा कलश पूजन कार्यक्रम सोहळा व सत्यनारायण महापूजा यानिमित्ताने ह .भ . प. निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख यांचे कीर्तन सोहळा दिनांक 3 ऑगस्ट रोजी दु.04 ते06 ठेवण्यात आलेला होता. याचे नियोजन रावा काळू खडके यांनी केलेले होते आपल्या घराच्या वास्तुशांतीसाठी निमित्त एक समाजामध्ये चांगल्या प्रकारे आदर्श व्यक्तीमत्व विकास होवा यासाठी प्रयत्न सुरू करू यासाठी अशी कल्पना केली आणि ती रुजवावी यासाठी सोहळा संपन्न करण्यात आला.महाराजांनी आपल्या कीर्तन सोहळ्यामध्ये वयस्कर मंडळींना एक सल्ला देण्यात आला पैशाची जपवणूक कशी करावी म्हातारपणात पैसा ठेवावा तर जीवन आयुष्य सुख समृद्धीने जगता येईल असे सांगण्यात आले. या सोहळ्यांमध्ये हास्य,विनोद यामुळे पब्लिक मध्ये आनंदाचे वातावरण होते .या सोहळ्याला उपस्थित दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात , माजी आमदार रंजनाताई सुभाष कुल, पाटस गावचे सत्वशील भाऊ शितोळे, सागर शितोळे, नितीन शितोळे, शिवाजी बापु ढमाले, संभाजी चव्हाण, साहेबराव तात्या वाबळे, ताकवणे, शेलार, राजेंद्र म्हस्के यांनी उपस्थिती दर्शविली व कार्यक्रमांची शोभा वाढवली. व कार्यक्रम संपताच10 मिनटांत वरुणराजाचे ही जोरदार आगमन झाले त्यामुळे एकच चर्चा कार्यक्रम नियोजित पार पडला.