अवसरी पंचक्रोशीत बळीराजांच्या लेकरांसाठी वरदान ठरलेल्या श्री हनुमान विद्यालय अवसरीच्या माध्यमातून नागपंचमीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन.

श्री हनुमान विद्यालय अवसरी हे अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरले आहे. कारण ज्यावेळी अवसरी मध्ये हे श्री हनुमान विद्यालय नव्हते, त्यावेळी मुला मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागत होती .मुली तर फक्त सातवीपर्यंतच शिक्षण घेत असे, कारण आठवीसाठी शिक्षण घ्यायचे म्हटले तर इंदापूरला जावे लागत असेल ,आणि इंदापूरला जायचे म्हटले तर कशाने जायचे हा मोठा प्रश्न उभा असायचा ,कारण महामंडळाची लालपरी असायची पण दिवसातून फक्त अवसरी साठी एकच वेळा यायची, आणि तीही शाळेचा टाइमिंग आणि लाल परी चा टाइमिंग वेगळा असायचा, त्यामुळे मुलींना तर शिक्षण घेताच येत नव्हते, मुलं आणि विशेष करून मुली शिक्षणापासून वंचित राहू लागल्या, आणि या सर्व अडचणी डोळ्यासमोर घेऊन अवसरीतील ग्रामस्थ आणि विशेष करून अरुण दादा शिंगटे यांनी पुढाकार घेऊन श्री हनुमान विद्यालय अवसरी या विद्यालयाची स्थापना केली. आणि केवळ त्याचमुळे अवसरी मधील व अवसरी पंचक्रोशीतील मुली मुलं शिक्षणापासून वंचित राहू शकली नाहीत. त्यामुळेच श्री हनुमान विद्यालय अवसरी हे मुला मुलींसाठी वरदानच ठरले आहे. आणि या विद्यालयातून जे विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले आहेत ते बऱ्यापैकी क्लासवन अधिकारी आणि मोठमोठ्या हुद्द्यावरती त्यांना नोकरी मिळाल्या आहेत. या विद्यालयातील सर्व शिक्षक स्टॉप अतिशय अभ्यासू आहे. या विद्यालयात शिस्तही तेवढीच कडक आहे. आणि सर्व विद्यार्थ्याकडून ही वैयक्तिक लक्ष देऊन अभ्यास करून घेतला जातो. या विद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी गॅदरिंग आणि वेगवेगळ्या स्पर्धाही घेतल्या जातात. तशीच दिनांक 3/8 /2022 रोजी श्री हनुमान विद्यालय तर्फे नागपंचमीनिमित्त सर्व महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .यामध्ये महिलांकरिता उखाणे स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा, नागपंचमी निमित्त जुनी पारंपारिक गाणी, फुगडी स्पर्धा ,चमचा लिंबू स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम दोन क्रमांक काढण्यात येणार असून यामध्ये विद्यालयाच्या वतीने प्रत्येक खेळामधून विजेत्या महिलेस पैठणी साडी बक्षीस दिले जाणार आहे.आणि मुलांसाठी ही पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि या स्पर्धेतील ज्याचा क्रमांक येईल त्याला बक्षीस मिळणार आहे अशी माहिती श्री हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज ला बोलताना दिली. तरी सर्व अवसरी व अवसरी पंचक्रोशीतील महिलांनी आवर्जून उपस्थित राहून या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे श्री हनुमान विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सौ विजया शिंगटे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज तर्फे सर्व महिलांना आव्हान केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here