इंदापूर तालुका पोलीस पाटील संघटना असोसिएशनच्या इंदापूर तालुका कार्यकारणीची निवड. वाचा सविस्तर .

इंदापूर: दि ३०/०७/२०२२ रोजी हॉटेल स्वामीराज सरडेवाडी येथे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळा व स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर इंदापूर तालुका पोलीस पाटील संघटना असोसिएशनच्या इंदापूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये इंदापूर तालुक्याचे अध्यक्षपदी – भारत (नाना) शंकरराव मारकड, कार्याध्यक्ष – अतुल नानासाहेब धनावडे, उपाध्यक्ष – अतुल मल्हारी डोंगरे, मनोज होडशीळ, सतीश सुबनावळ, तालुका सचिव – प्रदीप हरिदास भोई, तालुका – संघटक बाळासो भगवान कडाळे, मजहर शाबान सय्यद लुमेवाडी, प्रसिद्धीप्रमुख -किरण वामन खंडागळे, समन्वयक – सागर भारत खरात, हिरालाल विष्णू देवकर यांची निवड करण्यात आली. तर तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून मोहन नवनाथ चव्हाण, दिलीप रास्ते पोमण रामचंद्र भोसले, अजित केरबा बनसोडे यांची निवड करण्यात आली.तसेच तालुक्यातील महिला पोलीस पाटलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीच्या अध्यक्षपदी सौ रेश्मा दिलीप भिसे – राजवडी यांची नेमणूक करण्यात आली. तर कार्याध्यक्ष ज्योती संतोष भोसले – रेडा, उपाध्यक्ष पदी , पुनम सतीश जावळे – कालठण नं. १, शितल बापू बागाव –जांब, वर्षा पांडुरंग लोंढे – लासुर्णे, संघटक पदी दिपाली दीपक बोराटे – भरणेवाडी, उषा यल्लाप्पा वाघमोडे – शेळगाव, तालुका कार्यकारणी सदस्य – पिनाली संदीप गायकवाड कल्पना जगन्नाथ फुले यांची निवड करण्यात आली.तर पुणे जिल्ह्याच्या संघटनाची जबाबदारी जिल्हा संघटक म्हणून राजेंद्र चव्हाण – सणसर, महेंद्र पडळकर – रेडणी, बाळासाहेब गायकवाड – बेलवाडी ,अमर सुरेंद्र धुमाळ – तक्रारवाडी यांच्याकडे देण्यात आली.या सर्व नेमणुका महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना असोसिएशनचे राज्याध्यक्ष मा. श्री. महादेवराव नागरगोजे पाटील, राज्य संघटक दिलीप परिहार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिलीप (आबा) पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.पद नियुक्तीनंतर भारत (नाना) मारकड व रेश्मा (ताई) भिसे यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस पाटलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव उपलब्ध असणार असल्याबद्दल सांगितले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here