प्रतिनिधी : महेश सूर्यवंशी
दौंड, तालुक्यात निवडणुकांचे बिगुल वाजला गेल्यापासून तळागाळातील स्वयंघोषित नेत्यांचे आपापल्या गणात, गटात पक्षांच्या तिकिटा साठी ओढाचड लागलेली दिसून येत आहे. चार दहा मित्र परिवाराला हाताशी धरून आपल्या मतदार संघात खूप मतदार पाठीशी उभे असल्याचा भास करून घेत आहेत तसेच आपल्या वरिष्ठ नेत्यांना भास करून देत आहेत.त्या मध्ये असे बरेचसे स्वयंघोषित नेते आहेत ज्यांना आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य पदासाठी किंवा वि.का.सोसायटी साठी निवडून येण्याकरीता पुरेसे मतदार जुळऊन निवडून येता आले नाही.किंवा फक्त खादीची कपडे घालून नेत्यांच्या मागे फिरून स्वतःला नेता म्हणून घेत आहेत या अशा स्वयंघोषित नेत्यांच्या कामाचा आराखडा पहाता गावपातळीवर राजकारणात आणि मतदार संघात स्थान किती मोठे आहे आणि आपला दर्जा किती वरिष्ठ आहे हे दाखऊन देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तर काही मतदारांना आणि कार्यकर्त्यांना असे वाटत की प्रत्येक पक्षाने नवीन चेहरा आणि नवीन उमेदवार यांना कामाची संधी द्यावी यामुळे हाडामासाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल .आणि दुसरीकडे ज्यांच्या कामाचा दर्जा चांगला आहे जनतेच्या मनात ज्यांला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे कि यांना तिकीट मिळावे आहे नेते मात्र आपल्या विकासकामांच्या आणि जनतेच्या प्रश्न सोडवण्यात मग्न आहे या सर्व पार्श्भूमीवर तालुक्याच्या बड्या नेत्यांना मात्र डोकेदुखी होणार हे नक्की.
Home Uncategorized जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आरक्षण सोडत झाल्यापासून नवखे,हौशी,गौशी इच्छुकांच्या गुडघ्याला बाशिंग बांधून...