तब्बल 10 महिने दत्तनगर रोडवरील घाणीचे साम्राज्य व धोकादायक झाडे झुडपे हे नगराध्यक्ष,मुख्याधिकारी, नगरसेवक यांच्या दुर्लक्षमुळेच – राहुल गुंडेकर,शहराध्यक्ष मराठा सेवा संघ.

इंदापूर शहर दिवसेंदिवस वाढत आहे आणि या इंदापूर शहरालगतच दत्तनगर हा भागसुध्दा आता खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे.परंतु याच दत्तनगर भागाकडे जाताना काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य व महावितरणाच्या खांबावर तसेच महावितरण डीपी यावर झाडे झुडपे व बाभळी, वेली वाढल्यामुळे यामुळे हा रस्ता धोक्याचा बनला होता.या रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांबाबत व धोकादायक बनलेल्या महावितरणाच्या लाईन वरील वेलींबाबत नगरपालिकेशी वारंवार चर्चा करून सुद्धा हे काम अपूर्णच राहिले होते.अशातच मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर या युवकाने पुढाकार घेऊन महावितरण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व जेसीबी मालक या सर्वांच्या मदतीने सदरची झाडी झुडपे व धोकादायक बनलेल्या वेली काढून परिसर स्वच्छ केला.याबाबत राहुल गुंडेकर यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की,”इंदापूर नगरपरिषदेला वारंवार अर्ज देऊन आणि वारंवार विनंती करूनसुद्धा दत्तनगर भागात रस्त्या कढेला झाडी-झुडपे , लाईटचे पोल वरील पसरलेली घनदाट वेली आणि साचलेली घाण त्याचबरोबर लाईट डी.पी. येथे पसरलेल्या बाभळी हे सर्व काम तब्बल दहा महिने अपूर्णच राहिले होते. याचबाबत आज मी महावितरण इंदापूरचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ गोफणे,सहायक अभियंता प्रमोदकुमार जाधव, वायरमन फारूख मुल्ला,बापु कळसाईत व महावितरण टेंभुर्णीचे उपकार्यकारी अभियंता उद्धव जाधव,सहायक अभियंता आढेगावचे संदीप पाटील व कर्मचारी वर्ग कालिदास गायकवाड,समाधान साळुंखे व धनंजय, स्वयंम रोजगारचे सदस्य सद्गुरू,मच्छिंद्र त्याचबरोबर इंदापूर नगरपरिषदचे कर्मचारी लिलाचंद पोळ,रविराज राऊत,विलास चव्हाण,सुधिर पारेकर व जे.सि.बी मालक युवराज गलांडे यांच्या सर्वांच्या मदतीने सदर कामकाज पुर्ण झालेसदर रस्त्यावरील भरपूर मोठ्या प्रमाणात घाण साचत होती,पाऊस आला कि स्पार्कींग होत होती. दररोज दत्तनगर रोडवरून भरपूर जेष्ठ मंडळी फेरफटका मारत असतात त्याचबरोबर नर्सिंग काॅलेज मधील अनेक मुलींना,राहुल सिनेमा चित्रपटगृह ,गुरूकृपा कार्यालय मधील बरेच प्रेक्षक तेथून ये जा करत असतात. तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचा मागील अठवडयात कार्यक्रम राहुल सिनेमा येते झाला तेव्हा देखील सदर विषयची चर्चा पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्यात झाली होती परंतु काहीही प्रगती झाली नव्हती.परंतू आज हे काम पुर्णपणे मार्गी लागले आहे अशी माहिती मराठा सेवा संघ,इंदापूरचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here