एसटीमध्ये सापडलेले हजारो रुपयांचे चांदीचे दागिने असलेली बॅग एसटी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे केली परत.

👉कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे उदाहरण चर्चेचा सद्या विषय.
महाराष्ट्रात दळणवळणाच्या साधनांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची बस सेवा ही ग्रामीण व शहरी भागांच्या लोकांसाठी महत्त्वाचे साधन बनली आहे. एसटी कर्मचारी म्हणलं की अपार मेहनत व धगधगीचे जीवन असलेली कर्मचारी. अनेक वेळा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आंदोलने झालेली आपण पाहिले आहेत.अतिशय हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एसटी कर्मचारी आपले कुटुंब चालवत असतात. परिस्थिती हालाखीची असली तरीही एसटी कर्मचारी हे तेवढेच प्रामाणिकही असतात याचा एक उत्तम उदाहरण पुण्यामध्ये घडली आहे.प्रवाशाचे एसटीत विसरलेले चांदीचे दागिने त्यांनी परत करून इमानदारीचे उदाहरण समोर ठेवले आहे. एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी कोणत्याही लोभाला बळी न पडता एसटीत विसरलेले दागिने पुन्हा त्या प्रवासाच्या ताब्यात सोपवले आहेत.नागनाथ लामकमे आणि बालाजी मेळे अशी या दोन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, गुलबर्गा ते स्वारगेट ही एसटी बस स्वारगेट स्थानकावर आली होती. सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर चालक आणि वाहक असलेल्या नागनाथ आणि बालाजी यांनी बस डेपोत लावत असताना बसची पाहणी केली. यावेळी त्यांना एका सीटवर एक पिशवी आढळली. या पिशवीत चांदीचे दागिने होते.हे चांदीचे दागिने त्यांनी तत्काळ स्वारगेटचे बस स्थानक प्रमुख असलेल्या गोविंद जाधव यांच्याकडे नेऊन दिले. त्यानंतर बस स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांनी या दागिन्यांची चौकशी करत प्रवाशांची शहानिशा केली आणि ज्या प्रवाशाचे हे दागिने होते त्याला परत केले. प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल वाहक आणि चालकाचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.आणखी एक प्रामाणिकपणा:सलाम तुमच्या प्रामाणिकपणाला : रा प स्वारगेट आगारातील वर्कशॉप कर्मचारी श्री घोडके यांनी बसमध्ये प्रवाशांचा विसरलेला महागडा मोबाईल परत केला. त्या बद्दल सदर प्रवाशांने भेट वस्तू देऊनश्री. घोडके यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी श्री. जाधव साहेब , त्रिंबक मॅडम व श्री. कुंभार साहेब उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here