कुर्डूवाडी प्रतिनिधी: नसीर बागवान
कुर्डुवाडी:शहरातील रोडरोमिओंच्या त्रासामुळे शाळकरी मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपासून शाळा व्यवस्थित सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले. शाळेतील मुलींना शाळा व महाविद्यालयात येता-जाता रोडरोमिओंच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.यावर शालेय परिसरात विद्यार्थ्यांना संरक्षण देऊन पोलिस प्रशासनाने रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे. याबाबतचे निवेदन मनसेचे शहरप्रमुख सागर बंदपट्टेनी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत बोधे यांना दिले.दिलेल्या निवेदनात म्हटले की कुर्डुवाडी शहरातील मध्यवर्ती चेकनाका,पोस्ट चौक,बस स्टँड परिसर माढा रोड,स्टेशन चौक,पटेल चौक,परांडा रोड,टेंभुर्णी रोड या प्रमुख मार्गावरून मुलींना जावे लागते. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत रोडरोमिओ दुचाकी वेगाने चालवतात. तसेच मुलींजवळ जाऊन जोरात हॉर्न वाजवतात. शाळा- महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस चौकात टुकार टोळक्यां कडुन हे प्रकार अनेकदा घडले आहेत.आणि आजही घडताना निदर्शनास येत आहेत. तसेच विनापरवाना धारक मुलेही दुचाकी वेड्या- वाकड्या अतिशय वेगात गाङ्या चालवतात.यावरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारणे गरजेचा आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले. खरंतर कुर्डूवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी ही खूप चांगल्या पद्धतीचे आहे त्यामुळे अशा टुकार रोडरोमिओ यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन सामान्य महिलेला निडरपणेे कुर्डूवाडी शहरात फिरता यावे हीच अपेक्षा कुर्डूवाडीकर व्यक्त करत आहेत.
Home Uncategorized रोडरोमिओ कडे पोलिसांची डोळे झाक मुलींना होतो आहे नाहक त्रास. माय-बहिणीच्या संरक्षणासाठी...