निमगाव केतकी येथील संत सावता माळी अखंड हरिनाम सप्ताहात नेत्यांचे बॅनर लावण्यावरून वाद

👉मंदिरातील पादुका चोरी झाल्याचे कोणालाच नाही देणे घेणे
उपसंपादक निलकंठ भोंग
निमगाव केतकी: गेल्या तीन चार दिवसापासून निमगांव केतकी येथील श्री संत सावता माळी मंदिरावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे परंतु दि. २४ जुलै रोजी पहाटे मंदिरातून चांदीच्या पादुका चोरी झाल्या. परंतु गावकऱ्यांना चोरी झालेल्या पादुकांचे काही देणे घेणे नसून नेत्यांचे बॅनर लावण्यावरून मात्र वाद निर्माण झाला आहे.संत सावता माळी साप्ताह निमित्त आठ दिवसा अगोदर बैठक झाली होती. आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचे बॅनर लावायचे नाहीत असे सर्वानुमती ठरले असताना एक पोते साखरावरून हा वाद चिघळला आहे.त्याचे झाले असे की, सप्ताह निमित्त अन्नदानासाठी भाविकांकडून साखर, बेसन, तेल, गहू, तांदूळ असे साहित्य गोळा केले जाते. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी एक साखरेचे पोते दान केले आणि तेथूनच या वादाला ठिणगी पडली.
अन्नदान करणाऱ्यांची नावे रोज स्पीकरवर पुकारली जातात. त्यामुळे सावता माळी प्रतिष्ठान साठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून कामही पूर्ण केले त्यामुळे निधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मामांचा निधी दिल्याबद्दल आभार मानणारा बॅनर लावण्यात आला. आणि वादाला सुरुवात झाली.माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना विषयाची कल्पना देखील नाही परंतु गाव पातळीवर मात्र नेते मंडळी विनाकारण वाद निर्माण करत असतात अशी चर्चा सध्या सामान्य नागरिक करत आहेत.संत सावतामाळी महाराज मंदिरातील चांदीच्या पादुका पहाटेच्या वेळी चोरीला गेल्या असताना त्याविषयी बोलण्याचे सोडून गाव पुढारी आपल्या नेत्यांचे बॅनर लावण्यावरून वाद निर्माण करत आहेत अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here