दौंड ता.प्रतिनिधी:गणेश खारतुडे
दौंड तालुक्यात पाटस गावातील घोले वस्ती येथील गोरख खाडे या शेतकऱ्यांच्या दोन बकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये दोन्ही बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत .यापूर्वी बिबट्यांचे दर्शन हे नदीच्या शेजारील गावामध्ये होत होते .पण ते आता सर्व गाव वस्त्या यांमध्ये दिसून येत आहे .या हल्ल्यामुळे खाडे यांचे नुकसान झाले यांची भरपाई हवी यासाठी यांनी मागणी केली आहे.रात्रीच्या सुमारास बिबट्याने या बकऱ्यांचा फडशा पाडला व तो तिथून पळून गेला. ही घटना कळताच वन कर्मचारी घटनास्थळी हजर झाले त्यांनी पायांच्या ठशाची पाहणी केली व पंचनामा केला यानंतर स्थानिक नागरिकांना सागितले की पिंजरा लावण्यात येईल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वनविभागाने सतर्क राहून तत्काळ मदत व बिबट्यांचे नियोजन करावे असे नागरिकांमधून प्रश्न निर्माण होत आहे.
Home Uncategorized दौंड तालुक्यांत पाटस गावातील घोलेवस्ती येथे बिबट्याची दहशत, परिसरात भीतीचे वातावरण.