उपसंपादक -निलकंठ भोंग
“आजादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमांतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून पूर्ण देशभरात ७५ पेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ९ वा. पासून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंदापूर तालुक्यातही गोतोंडी या ठिकाणी पालखी महामार्गावर कामठे कंट्रक्शन यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी राज्यमंत्री तसेच इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री भरणे म्हणाले की, हा पालखी महामार्ग होण्यासाठी लोकनेते शरदचंद्रजी पवार यांनी खूप मोठ्या प्रमाणावर बैठका घेऊन हा पालखी महामार्ग होण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून येणाऱ्या योजना या माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात निश्चितच काम करेल. तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल कामठे कंट्रक्शन चे कौतुकीही केले.यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुका हा खूप नशीबवान आहे कुठलाही माणूस रस्त्याला लागला की तो राष्ट्रीय महामार्गालाच लागेल, कारण पुणे सोलापूर महामार्ग तसेच पालखी महामार्गाचे जाळे सबंध तालुक्यात पसरले आहे. रस्ता चांगला झाला म्हणून स्पीड वाढवू नका असे आव्हान ही त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर हा कार्यक्रम घेतल्याबद्दल कामठे कंट्रक्शनचे आभारही मानले.यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक,कामठे कंट्रक्शनचे नंदकिशोर कामठे, यश कामठे, NHAI नारायणकर,महेश कामठे, प्रोजेक्ट मॅनेजर पंकज जगताप, ऐ.के.सिंग गोतोंडी गावचे सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, दिनकर नलवडे, युवराज मस्के, उपस्थित होते.
Home Uncategorized माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत...