इंदापूर पोलिसांच्या दमदार कामगिरीचे सत्र सुरूच.. काल रात्री पकडला तब्बल 95 लाख रु.गुटख्यासह मुद्देमाल.. तीन महिन्यात तब्बल 7 कारवायामध्ये 2 कोटी 83 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

इंदापूर: गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे. गेल्या 3 महिन्यातच अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या 7 कारवाया याच कर्तव्यदक्ष इंदापूर पोलिसांनी केल्या असून यामध्ये आतापर्यंत 2 कोटी ८३ लाख रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर झालेल्या कारवाया या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई समजली जातात.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा वाहतूक नियंत्रण व कायदा संस्था राखण्यात पो. नि.मुजावर यांची टीम यशस्वी झालेले दिसून आली होतीदि. 16 रोजी इंदापूर पोलीस रात्रीच्या वेळी सरडेवाडी टोलनाक्याजवळ नाकाबंदी करत असताना अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रॅकवर कारवाई करीत जवळपास 68 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा गुटखा व 25 लाख रुपयांचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असा तब्बल 93 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदरची कारवाई इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली  केली. या तीन महिन्यातील ही सातवी कारवाई इंदापूर पोलिसांकडून करण्यात आली.
सविस्तर माहिती अशी की, इंदापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत सरडेवाडी टोल नाक्याजवळ नाकाबंदी करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक कर्नाटक पासिंगचा ट्रक हा सोलापूर बाजू कडून पुणे बाजूकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी टोल नाका येथे सापळा रुचून अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक KA – 28- B – 9831 यास थांबवून संशयितरित्या तपासणी केली असता त्यामध्ये  सुगंधी गुटख्याची 178 गोण्या आढळून आल्या.इंदापूर पोलिसांनी सदर कारवाई मध्ये 68 लाख 23 हजार 920 रुपयांचा सुगंधी गुटखा व अवैध वाहतूक करणारा 25 लाख रुपयांचा ट्रक असा तब्बल 93 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ट्रकच्या चालक-मालका विरुद्ध अन्न व सुरक्षा अधिनियम तसेच भारतीय कलम 328 व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर, सपोनी ज्ञानेश्वर धनवे, सपोनी महेश माने, पोसई सुधीर पाडूळे, पो.हवा. बालगुडे, पो.ना. मनोज गायकवाड, पो.ना. बापू मोहिते, पो.ना. महेंद्र पवार, पो.ना. मोहम्मदअली मडी, पो.ना. जगदीश चौधर, पो.ना. भोईटे, पो.ना.सलमान खान, पो.कॉ. सूर्यवंशी, पो. कॉ. चोरमले, पो. कॉ. राखुंडे यांनी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here